'नासाला त्याच्या चार प्रमुख इंजिनांपैकी एका इंजिनांमध्ये बिघाड दिसून आल्यामुळं ही मोहीम रद्द केली होती.
वॉशिंग्टन : नासा (NASA) येत्या शनिवारी आपलं शक्तिशाली न्यू मून रॉकेट (New Moon Rocket) प्रक्षेपित करण्याचा नवीन प्रयत्न करणार आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला चाचणी प्रक्षेपण आयोजित करण्याची योजना होती. मात्र, नंतर ती रद्द करण्यात आली.
याबाबत माहिती देताना एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, प्रक्षेपणाच्या अंतिम तयारीदरम्यान इंधनाची गळती आणि नंतर इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळं सोमवारी सकाळी त्याचं नियोजित प्रक्षेपण पुढं ढकलावं लागलं. विशेष म्हणजे, हे लाँचिंग पाहण्यासाठी हजारो लोक जमले होते. यात अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरिस (Kamala Harris) यांचाही समावेश होता.
AFFI च्या अहवालानुसार NASA मधील आर्टेमिस (Artemis) 1 मिशन मॅनेजर माईक सराफिन (Mike Sarafin) यांनी मंगळवारी मीडियाशी बोलताना नवीन प्रक्षेपणाची तारीख जाहीर केली. पहिल्या अयशस्वी प्रयत्नाचं वर्णन करताना अधिकाऱ्यांनी सांगितलं की, 'नासाला त्याच्या चार प्रमुख इंजिनांपैकी एका इंजिनांमध्ये बिघाड दिसून आल्यामुळं ही मोहीम रद्द करण्यात आली. प्रक्षेपण पुढं ढकलण्याच्या घोषणेनंतर, अभियंत्यांनी डेटा गोळा करणं आणि समस्येचं मूळ शोधणं सुरूच ठेवलं होतं.'
अंतराळयानाबद्दल बोलायचं झालं, तर ते 322 फूट किंवा 98 मीटर लांब आहे. जे NASA द्वारे तयार केलेलं सर्वात शक्तिशाली रॉकेट आहे. अपोलो प्रोग्रामच्या अंतराळवीरांना चंद्रावर घेऊन गेलेल्या Saturn-5 पेक्षाही अधिक शक्तिशाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.