ट्रम्प यांच्या पत्नीच्या मृत्यूबाबत नवा खुलासा; शवविच्छेदन अहवालातून माहिती समोर

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली पत्नी इवाना यांचं शुक्रवारी निधन झालं.
Iavana Donald Trump
Iavana Donald Trump
Updated on

वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली पत्नी इवाना ट्रम्प यांचं शुक्रवारी निधन झालं. ७३ वर्षीय इवाना यांचा मृत्यू अपघाती मृत्यू झाल्याची नवी माहिती समोर आली आहे. इवानाच्या शवविच्छेदनानंतर न्यूयॉर्कचे मुख्य वैद्यकीय अधिकऱ्यांनी सांगितलं की, इवाना यांचा मृत्यू शरीरावराला मार लागल्यानं झाली आहे. पण अहवालात नक्की त्यांच्यासोबत काय अपघात घडला याचा उल्लेख केलेला नाही. (New revelations about Trump wife death info comes from the autopsy report)

Iavana Donald Trump
मेक्सिकोत ड्रग्ज माफियाची दहशत; अटकेनंतर नौदलाचं हेलिकॉप्टर पाडलं, १४ ठार

डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी सोशल मीडियावरुन इवाना यांच्या निधनाची बातमी दिली होती. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं की, "मला त्या सर्वांना ही गोष्ट सांगताना अतिशय दुःख होतंय जे सर्वजण इवाना ट्रम्प यांच्यावर प्रेम करत होते. इवाना ट्रम्प यांचं न्यूयॉर्क शहरातील त्यांच्या घरी निधन झालं आहे. इवाना एक अद्भुत आणि सुंदर महिला होती. तिनं एक आदर्श आणि प्रेरणादायी जीवन व्यतीत केलं. आपली तीन मुळं डोनाल्ड ज्युनिअर, इवांका आणि एरिक यांचा तिला अभिमान होता. आम्हाला देखील इवाना ट्रम्पचा अभिमान आहे. रेस्ट इन पीस, इवाना!"

पायऱ्यांजवळ मिळाला होता इवाना यांचा मृतदेह

या घटनेची माहिती देणाऱ्यांच्या मते, इवाना यांचा पायऱ्यांजवळ मृतावस्थेत आढळल्या होत्या. पोलिसांनी देखील याच माहितीच्या आधारे तपास सुरु केला होता. न्यूयॉर्क पोलिसांनी सांगितलं की, इवाना ट्रम्प बेशुद्ध झाल्याची माहिती मिळाली होती. त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचं जाहीर करण्यात आलं होतं.

१९७७ मध्ये ट्रम्प यांच्यासोबत झालं होतं लग्न

पूर्व झेकोस्लोवाकिया इथं कम्युनिस्ट राजवटीत मोठ्या झालेल्या इवाना यांनी सन १९७७ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी लग्न केलं होतं. सन १९९२ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. ट्रम्प आणि इवाना हे जोडपं १९८० आणि १९९० च्या दशकात न्यूयॉर्कमधील एक चर्चित सार्वजनिक जोडपं होतं. त्यांचा घटस्फोट हा देखील खूपच चर्चिला गेलेला विषय होता. घटस्फोटानंतर इवाना यांनी सौंदर्य उत्पादनं, उंची कपडे आणि आभुषणांच्या व्यवसायात उतरल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.