Earth Rotation : पृथ्वीच्या आतील गाभ्याचं रोटेशन थांबलं; नव्या अभ्यासातून महत्त्वपूर्ण माहिती उघड

Earth Rotation
Earth Rotation
Updated on

Earth Rotation - पृथ्वीच्या आतील गाभ्याचं अलीकडेच फिरणं थांबलं आहे. तसेच फिरण्याची दिशा उलट झाल्याचं एका अभ्यासातून उघड झालं आहे. पृथ्वीच्या आतील थरांमधील गतिशीलता आणि परस्पर संबंध समजून घेण्यासाठी हा अभ्यास महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Earth Rotation
Pathaan Release : शाहरुखला दिलासा! 'यामुळे' विहिंप, बजरंग दलाचा 'पठाण'ला असलेला विरोध मावळला

कवच, आवरण आणि गाभा या तीन थरांनी पृथ्वी बनलेली आहे. भूकंपातून येणाऱ्या भूकंपीय लहरींच्या अभ्यासाद्वारे पृथ्वीच्या मध्यभागी असलेल्या आतील गाभ्याची ओळख सर्वप्रथम १९३६ मध्ये झाली होती. याची रुंदी सुमारे ७,००० किलोमीटर असून ते द्रव स्वरुप लोखंडी कवचाचे बनलेले आहे.

१९९६ च्या नेचर अभ्यासानुसार, गेल्या तीन दशकांमध्ये भूकंपीय लहरींना पृथ्वीच्या आतील गाभ्यातून प्रवास करण्यासाठी लागणाऱ्या वेळेत थोडासा बदल झाला आहे. आतील गाभ्याचे रोटेशन हे आवरण आणि कवच यांच्यापेक्षा वर्षाला सुमारे 1 अंश वेगाने अधिक आहे. हेच या बदलाचे कारण मानले जात आहे.

Earth Rotation
Chitra Wagh : 'तो' फोटो शेअर करत शिवसेनेने डिवचलं; चित्रा वाघ उत्तर देत म्हणाल्या, कायम घरात बसून...

पीकिंग युनिव्हर्सिटीच्या नुकत्याच समोर आलेल्या अभ्यासानुसार, 2009 मध्ये आतील गाभा फिरणे थांबले आहे. तसेच ते दिशा बदलण्याच्या प्रक्रियेत असू शकते.

नेचर जिओसायन्समध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, गाभ्याच्या परिभ्रमणाचा दिवसाच्या लांबीच्या बदलांवर परिणाम होतो. शिवाय पृथ्वीला त्याच्या अक्षयावर फिरण्यास जो वेळ लागतो, त्यातही किरकोळ बदल होऊ शकतात.

संशोधकांच्या म्हणण्यानुसार, या निरीक्षणांमध्ये पृथ्वीच्या थरांमधील गतिशील परस्परक्रियांचे पुरावे दिसून आले आहेत. गुरुत्वाकर्षण आणि पृथ्वीच्या थराच्या आवरणातून पृष्ठभागावर कोणीय संवेगाचे हस्तांतरण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Earth Rotation
Santosh Bangar : आमदार संतोष बांगर यांची दादागिरी सुरूच, प्राचार्यांनाच केली मारहाण

पीकिंग युनिव्हर्सिटीच्या रिसर्च टीमचा असा अंदाज आहे की त्यांचे निष्कर्ष पृथ्वीच्या थरांमधील गतिशील परस्परक्रिया आणि ग्रहाच्या भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यावर कसा परिणाम करू शकतात याबद्दल अतिरिक्त अभ्यास करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतील.

हेच परस्परसंवाद आणि संपूर्ण पृथ्वी समजून घेण्यासाठी आवश्यक हे आहे. मात्र आतील गाभ्याच्या परिभ्रमणातील बदलामुळे पृष्ठभागावर राहणाऱ्यांना नुकसान होईल अशी कुठलीही शक्यता सध्या तरी दिसत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.