Nigeria Boat Accident : लग्नाला आलेल्या पाहुण्यांना नेणारी बोट बुडाली; १०० हून अधिक जणांचा मृत्यू!

आतापर्यंत सुमारे १०० लोकांना वाचवण्यात यश मिळाले असून, आणखी लोकांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Nigeria Boat Accident
Nigeria Boat AccidenteSakal
Updated on

लग्नाला आलेल्या पाहुण्यांना नेणारी एक बोट बुडून सुमारे १०० जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये कित्येक लहान मुलांचा समावेश होता. या बोटीवर जवळपास ३०० लोक होते. आतापर्यंत सुमारे १०० लोकांना वाचवण्यात यश मिळाले असून, आणखी लोकांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

नायजेरियातील क्वारा राज्यात ही दुर्घटना घडली. नायजर नदी ओलांडताना ही बोट त्यामध्ये बुडाली. या बोटीत आधीपासूनच क्षमतेपेक्षा जास्त लोक होते. त्यातच ही बोट पाण्यातील एका मोठ्या ओंडक्याला धडकली. यामुळे बोटीचे दोन तुकडे झाले, आणि ही बोट बुडाली (Nigeria Boat Accident). स्थानिक अधिकारी अब्दुल गाना लुकपाडा यांनी याबाबत माहिती दिली.

पहाटे तीन वाजता झाला अपघात

इगबोटी नावाच्या एका गावात लग्नासाठी हे सगळे लोक एकत्र आले होते. सोमवारी रात्री उशीरापर्यंत पार्टी केल्यानंतर हे सगळे निघाले होते. पहाटे तीनच्या सुमारास ही दुर्घटना घडल्यामुळे काही तास कोणालाच याबाबत माहिती मिळाली नाही. त्यामुळे मदतकार्य देखील भरपूर उशीरा सुरू झालं. स्थानिक प्रशासनाला माहिती मिळण्यापूर्वी आजूबाजूच्या गावातील लोकांनी सुमारे ५० जणांचे प्राण वाचवले होते.

Nigeria Boat Accident
Biparjoy Update: बिपरजॉय चक्रीवादळाचा पाकिस्तानला मोठा फटका: ३४ जणांचा मृत्यू

मृतदेहांचा शोध सुरू

मंगळवारी दुपारपर्यंत जेवढ्या मृतदेहांचा शोध लागला, त्यांना सायंकाळी जवळच दफन करण्यात आलं. स्थानिक अंत्यसंस्काराचे विधी पार पाडून हे करण्यात आलं. यानंतर अजूनही मृतदेहांचा शोध सुरू असून, बुधवारपर्यंत ही मोहीम राबवण्यात येणार आहे अशी माहिती लुकपाडा यांनी दिली.

नायजेरियामध्ये बोट दुर्घटनांचे प्रमाण गंभीर आहे. स्थानिक लोक बहुतांश साध्या पद्धतीचे तराफे किंवा बोटी वापरतात. यातच एका बोटीवर भरपूर लोक नेण्याचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे, अशा प्रकारच्या दुर्घटना होतात.

Nigeria Boat Accident
BBC Modi Documentary: भारतात बॅन, पण अमेरिकेत दाखवली जाणार BBC ची डॉक्युमेंटरी; पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वीच...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.