हे शौकीन लोक मागवतात इंग्लडहून पिझ्झा, वाचा काय आहे प्रकरण

हे लोक इंग्लडहून विमानाने पिझ्झा मागवतात.
pizza
pizzasakal
Updated on

पिझ्झा हा प्रत्येकाच्या आवडीचा पदार्थ. पिझ्झा लव्हर पिझ्झा खाण्यासाठी काहीपण करू शकतात. पिझ्झा हा तुम्ही घरबसल्या ऑर्डर केला असेल पण आम्ही जर तुम्हाला सांगितले की काही लोक पिझ्झा दुसऱ्या देशातून मागवतात… हो तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरंय.

नायजेरिया देशातील लोक दुसऱ्या देशातून विमानाने पिझ्झा मागवतात. सध्या हे प्रकरण सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे

pizza
थायलंडमध्ये गांजा कायदेशीर; आशियातील ठरला पहिला देश

नायजेरियात लोक विमानातून चक्क इंग्लंडमधून पिझ्झा मागवतात. ही खरंच आश्चर्याची बाब आहे. ही माहिती स्वत: खुद्द देशाच्या कृषीमंत्र्यांनी दिली आहे. कृषीमंत्री औदू ओग्बेह यांनी सांगितले की नायजेरियन लोक आपली श्रीमंतपणा दाखवण्यासाठी चक्क परदेशातून पिझ्झा मागवत आहेत. विशेष म्हणजे ही ऑर्डर त्यांच्या घरी विमानाने पाठवली जाते.

pizza
तब्बल दोन वर्षांनंतर भारत-बांगलादेश क्रॉस-बॉर्डर बससेवा पुन्हा सुरू

परदेशातून पिझ्झा मागवणाऱ्या या लोकांबद्दल लोक आश्चर्य व्यक्त करतात. लोक रात्री पिझ्झाची ऑर्डर केली जाते. यानंतर पिझ्झा तयार केला जातो आणि चांगला पॅक केला जातो. त्यानंतर पॅक केलेला विमानाने नायजेरियाला पाठवला जातो. सकाळी हा पिझ्झा विमानतळावर येतो आणि त्यानंतर दिलेल्या पत्त्यावर हा पाठवला जातो. सध्या हे प्रकरण चर्चेचा विषय आहे.

या प्रकरणामुळे तेथील स्थानिक विक्रेत्यांना त्याता फटका बसत आहे. तर अनेकांनी या पिझ्झा ऑर्डसना बंद करण्याची मागणी केली आहे. यासाठी कृषीमंत्र्यांनीही सुद्धा सरकारकडे प्रस्ताव दिला होता. नायजेरीयातील अनेक श्रीमंत लोक केवळ आपल्या शौकपोटी इंग्लंडमधून पिझ्झा मागवतात. ला या ऑर्डर देऊ नयेत, असे आवाहनही केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.