लाहोर : सध्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Pakistan PM Imran Khan) यांची खुर्ची धोक्यात आहे. त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला असून त्यावरील मतदानापूर्वीच इम्रान खान यांनी मोठा दावा केला आहे. माझ्या पक्षाचे सरकार पाडण्यात विदेश शक्तींचा हात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. इतकंच नाहीतर याचा पुरावा असल्याचे पत्र देखील आपल्याकडे असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांनी इस्लामाबाद (Islamabad) येथील परेड ग्राऊंडवर रविवारी तेहरीक-ए-इन्साफ पक्षाच्या रॅलीला संबोधित केले. यावेळी ते बोलत होते.
''देशाचे परराष्ट्र धोरण ठरविण्यासाठी विदेशी घटक स्थानिक राजकारण्यांचा वापर करतात. परकीय निधीतून पाकिस्तानमधील सरकार बदलण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आपल्या देशातील लोकांचा सरकार पाडण्यासाठी वापर केला जात आहे. आपलेच पैसे आपल्या सरकारविरोधात वापरत आहेत. तुम्हाला हे खोटं वाटेल. पण, मला लेखी धमक्या येत आहेत'', असा दावा इम्रान खान यांनी केला. याबाबत स्थानिक माध्यमांनी वृत्त दिलं आहे.
माझ्याकडे एक पत्र असून शंका घेणाऱ्यांनी ते पत्र खोटे असल्याचं सिद्ध करून दाखवावं, असं आव्हान खान यांनी दिलं. तसेच माझ्याविरोधात विदेश षड्यंत्र रचलं असून त्याबाबत काही गोष्टींचा लवकरच खुलासा करणार असल्याचं त्यांनी म्हटलं. माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाझ (पीएमएल-एन) नेते नवाझ शरीफ, पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते आणि माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी आणि जमियत उलेमा-ए-इस्लामचे नेते फजलुर रहमान यांचा उल्लेख करून ते म्हणाले की या लोकांना माफ करणार नाही.
विरोधी पक्षांनी इम्रान खान यांच्याविरोधात ८ मार्चला अविश्वास प्रस्ताव मांडला. त्यानंतर पाकिस्तानमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे. देशात आर्थिक संकट असून वाढत्या महागाईला पंतप्रधान इम्रान खानचे सरकार जबाबदार असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्याविरोधात विरोधकांनी मोर्चे काढून निषेध देखील नोंदवला आहे. तसेच हा इम्रान खान सरकारचा शेवट आहे, असं मरियम नवाज म्हणाल्या होत्या.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.