Nobel Prize 2023: कोविड लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञांना मिळाले नोबेल, कोण आहेत कॅटालिन कॅरिको आणि ड्रयू वेसमन?

Nobel Prize Medicine award 2023: नोबेल पुरस्कारांची घोषणा सोमवारपासून सुरू झाली आहे.
Nobel Prize 2023 in Medicine goes to Katalin Kariko, Drew Weissman for mRNA Covid vaccines
Nobel Prize 2023 in Medicine goes to Katalin Kariko, Drew Weissman for mRNA Covid vaccines Sakal
Updated on

Nobel Prize 2023: 2023 सालच्या नोबेल पुरस्कारांची घोषणा सोमवारपासून सुरू झाली आहे. आज म्हणजेच 2 ऑक्टोबर 2023 रोजी, या वर्षीचे वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक कॅटालिन कॅरिको आणि ड्रयू वेसमन यांना फिजिओलॉजी किंवा मेडिसिन या क्षेत्रातील योगदाना बद्दल देण्यात आले. न्यूक्लिओसाइड बेस मॉडिफिकेशनशी संबंधित शोधासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

कोण आहेत कॅटालिन कॅरिको?

कॅटालिन कॅरिकोचा जन्म 1955 मध्ये जोलनोक, हंगेरी येथे झाला. त्यांनी 1982 मध्ये जेगेड विद्यापीठातून पीएचडी केली. यानंतर त्यांनी हंगेरियन अकादमी ऑफ सायन्सेसमध्ये पोस्ट-डॉक्टरल फेलोशिप पूर्ण केली.

यानंतर त्यांनी टेम्पल युनिव्हर्सिटी, फिलाडेल्फिया येथे पोस्ट-डॉक्टरेट संशोधन पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी पेनसिल्व्हेनिया विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केले.

2013 नंतर, Caitlin BioNTech RNA फार्मास्युटिकल कंपनीच्या वरिष्ठ उपाध्यक्ष झाल्या. 2021 मध्ये, त्यांनी कोविड काळात कोरोनासाठी mRNA लस विकसित केली.

Nobel Prize 2023 in Medicine goes to Katalin Kariko, Drew Weissman for mRNA Covid vaccines
Old Tree In England : इंग्लंडमधील 200 वर्षे जुने झाड तोडले अन् सुरू झाला राडा, काय होतं असं विशेष?

कोण आहेत ड्रयू वेसमन?

ड्रयू वेसमन यांचा जन्म मॅसॅच्युसेट्समध्ये 1959 मध्ये झाला. त्यांनी 1987 मध्ये बोस्टन विद्यापीठातून पीएचडी आणि एमडी पदव्या मिळवल्या. यानंतर, त्यांनी हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या बेथ इस्रायल डेकोनेस मेडिकल सेंटरमध्ये क्लिनिकल प्रशिक्षण सुरू ठेवले.

1997 मध्ये, वेसमनने स्वतःचा संशोधन ग्रुप स्थापन केला. पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातील पेरेलमन स्कूल ऑफ मेडिसिनमध्ये त्यांनी संशोधन सुरू केले. सध्या ते पेन इन्स्टिट्यूट ऑफ आरएनए इनोव्हेशनचे संचालक आहेत.

Nobel Prize 2023 in Medicine goes to Katalin Kariko, Drew Weissman for mRNA Covid vaccines
Pakistan Attacks : एका वर्षात 365 हल्ले… दहशतवादाचा बालेकिल्ला असलेल्या पाकिस्तानमध्ये इतके बॉम्बस्फोट का होतात?

पुढील नोबेल पुरस्कार कधी मिळणार?

  • 3 ऑक्टोबर दुपारी 3:15 वाजता: भौतिकशास्त्र

  • 4 ऑक्टोबर दुपारी 3:15 वाजता: रसायनशास्त्र

  • 5 ऑक्टोबर दुपारी 4:30 वाजता: साहित्य

  • 6 ऑक्टोबर दुपारी 2:30 वाजता: शांती

  • 9 ऑक्टोबर दुपारी 3:15 वाजता: अर्थशास्त्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.