‘मॅलिंगयाँग-१’ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण झाल्याचा उत्तर कोरियाचा दावा, संपूर्ण जगाला धोक्याची शक्यता

North Korea
North Korea
Updated on

North Korea: हेरगिरी उपग्रह यशस्वीपणे अवकाशात सोडल्याचा दावा उत्तर कोरियाने बुधवारी केला. कोरियाने गेल्या सहा महिन्यांत दोनदा या उपग्रहाचे उड्डाण केले होते. पण त्यात अपयश आले होते. आज तिसऱ्यांदा केलेला प्रयत्न यशस्वी ठरल्याचे सांगण्यात आले.

उत्तर कोरियाच्या सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार काल रात्री पावणेदहाच्या सुमारास सोहे उपग्रह उड्डाण केंद्रावरून यानाचे प्रक्षेपण झाले. यानंतर १२ मिनिटांनी ‘मॅलिंगयाँग-१’ हा उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत यशस्वीपणे स्थापित करण्यात आला. (Latest Marathi News)

या उपग्रहाद्वारे अवकाशातून हेरगिरी आणि निरीक्षण करणे उत्तर कोरियाला शक्य होणार आहे. २२ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या काळात उपग्रह सोडणार असल्याची सूचना कोरियाने जपानला दिली होती. त्यानंतर काही तासांनीच मॅलिंगयाँग-१’चे उड्डाण झाले.

उत्तर कोरियाने केलेल्या या दाव्याची शहानिशा शेजारील देश आणि जगभरातील तज्ज्ञ करीत आहेत. उत्तर कोरियाच्या आण्विक कार्यक्रमावर निर्बंध लादण्याच्या संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) ठरावाचे हे उल्लंघन असल्याचे मानले जात आहे. उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम उन जोंग हे उड्डाण केंद्रावर उपस्थित होते.

North Korea
Shiv Sena MLA Disqualification : धिम्यागतीनं सुरु असलेल्या सुनावणीवर नार्वेकरांची नाराजी; म्हणाले, फक्त...

संपूर्ण जगाला धोका

अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा मंडळाचे प्रवक्ते एड्रीन वॉटसन म्हणाले, की उत्तर कोरियाच्‍या या उपग्रहामुळे तणाव वाढेल. कोरियाच्या जवळपासच्या भागातील सुरक्षा व्यवस्थेवर विनाकारण ताण येईल. या देशाच्या अंतर-खंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र मोहिमेमुळे संपूर्ण जगाला धोका उत्पन्न होऊ शकतो.

North Korea
'पनवती' शब्दावर आक्षेप, राहुल गांधी अन् खर्गेंविरोधात भाजपची EC मध्ये तक्रार...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.