पाकिस्तान आणि उत्तर कोरिया दरम्यान वादाचे वृत्त समोर आले आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला पाकिस्तानच्या पोलिसांनी इस्लामाबाद येथील उत्तर कोरियाच्या दुतावासात मोठ्या प्रमाणावर दारु साठा असल्याची माहिती मिळाल्यावर छापा टाकला होता. या घटनेवरुन उत्तर कोरियाने आक्षेप नोंदविला आहे. उत्तर कोरियाच्या दुतावासाच्या वतीने म्हटले आहे, की या घटनेने व्हिएन्ना कराराचे उल्लंघन झाले आहे. छापेमारीच्या वेळेस दुतावासाचे नुकसान झाल्याचे ही वृत्त आहे. पाकिस्तानचे (Pakistan) वृत्तपत्र डाॅनच्या वृत्तानुसार, घटनेची माहिती देताना उत्तर कोरियाच्या दुतावासाने इस्लामाबादचे पोलिस महानिरीक्षकांना पत्र लिहिले आहे. पत्रात म्हटले आहे, की इस्लामाबादचे एफ-१० पोलिस ठाण्यातून सात पोलिस कर्मचारी, त्यात एक महिला पोलिसही सामील होती. (North Korea Embassy Disappointed Police Raid With Pakistan)
सोमवारी सात मार्च रोजी दुतावासात आले आणि त्यांनी बेकायदेशीरपणे दूतावासात प्रवेश केला. दुतावासाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना आठवण करुन दिली की दुतावासाचा परिसर उत्तर कोरिया दुतावास (North Korea Embassy) सार्वभौम भाग आहे. कर्मचारी म्हणाला पोलिसांनी आपली छापेमारी थांबवावी. मात्र पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले. पोलिसांनी काही सामान जप्त करण्याचे निमित्त करुन मागील स्टोररुमची तपासणी केली आणि दुतावासाच्या कर्मचाऱ्यांना बंदुकींचा धाक दाखवून धमकावले. पत्रात पुढे म्हटले आहे, की पोलिस अधिकाऱ्यांनी दरवाजे तोडले. या छाप्याच्या मागे कोणत्या तरी बाहेरील शक्तीचा हात असल्याचा आरोप दुतावासाने केला आहे.
पोलिस काय म्हणतात?
पोलिस म्हणतात, की त्यांना माहिती मिळाली होती, की दुतावासात मोठ्या प्रमाणावर दारु आहे. इस्लामाबाद, शालीमार पोलिस ठाण्याच्या सूत्राला दुतावासात मोठ्या प्रमाणावर दारु असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार छापेमारी करण्यात आली होती. पोलिस महानिरीक्षक यांनी एक वरिष्ठ पोलिस अधीक्षकाला चौकशी करणे आणि तीन दिवसांत अहवाल द्यायला सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.