नवी दिल्ली- उत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंग ऊन हे दक्षिण कोरियाला त्रास देण्यासाठी एका वेगळ्या पर्यायाचा वापर करत आहेत. रिपोर्टनुसार किम जोंग ऊन दक्षिण कोरियामध्ये फुगे पाठवत आहेत. यामध्ये कचरा, सिगरेटचे तुकडे, प्लास्टिक कचरा आढळून आला आहे. काही फुग्यांमध्ये मलमूत्र असल्याची देखील माहिती मिळत आहे. या सर्व प्रकारामुळे दक्षिण कोरिया पुरता हैराण झाला असून देशात अलर्ट जारी करण्यात आला आहे.
उत्तर कोरियामधून येणाऱ्या या फुग्यांमुळे दक्षिण कोरियामध्ये भीतीचे वातावरण आहे, कारण या फुग्यांमध्ये रासायनिक अस्त्र किंवा विस्फोटकं असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. आकाशातून पडलेल्या वस्तूचा स्पर्श न करण्याचा आणि त्याच्या जवळ न जाण्याचा आदेश दक्षिण कोरिया सरकारकडून देण्यात आला आहे.
रिपोर्टनुसार, उत्तर कोरियाने मागील आठवड्यापासूनच दक्षिण कोरियाच्या सीमा भागात असे फुगे पाठवण्यास सुरुवात केली होती. शनिवारी यात वाढ झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शनिवारी रात्री राजधानी सियोल आणि जवळपासच्या भागामध्ये जवळपास ९० फुगे सापडले आहेत. यामध्ये कचरा सापडला आहे.
दक्षिण कोरियाने कोणत्याही संशयीत वस्तूला स्पर्श न करण्याचा सल्ला देशवासियांना दिला आहे. तसेच. संदिग्ध वस्तू आढळली तर याबाबत तात्काळ पोलिसांना सूचना करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. आतापर्यंत अशा प्रकारामध्ये कोणी जखमी झाल्याची माहिती नाही. पण, खबरदारी घेतली जात आहे.
दक्षिण कोरिया सैन्याने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार पासून आतापर्यंत कमीतकमी २६० फुगे आकाशात सोडण्यात आले होते. यामध्ये विविध प्रकारचा कचरा होता. पण, यामध्ये रासायनिक, जैविक आणि रेडिओअॅक्टीव असले धोकादायक पदार्थ आढळून आले नाहीत. दरम्यान, उत्तर कोरियाचे प्रमुख दक्षिण कोरियाला त्रास देण्यासाठी अशा नवनवीन गोष्टी करत असतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.