उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन मंगळवारी रशियाला गेले आहेत. ते व्लादिवोस्तोक शहरामध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांची भेट घेतील, अशी चर्चा आहे. दीड वर्षांपासून चालू असलेल्या रशिया युक्रेन युद्धाच्या दृष्टीने या दोघांची भेट महत्त्वाची आहे. पुतीन आणि किम जोंग उन एकमेकांच्या सहकार्याने काही पावले उचलण्याचीही शक्यता आहे.
पण या सगळ्यात एक विशेष गोष्ट अशी आहे की, किम इतर नेत्यांप्रमाणे विमानातून प्रवास करत नाहीत, तर ते रेल्वेने प्रवास करतात. प्रत्येक प्रकारची सुविधा असलेल्या या रेल्वेचा इतिहासही महत्त्वाचा आहे. किम जोंग उन यांना विमान प्रवास करण्याची भीती वाटते. ही भीती त्यांच्या घरातल्या इतर लोकांनाही वाटत असे.
म्हणजे किम यांचे वडील आणि आजोबाही विमान प्रवास करायला घाबरत असत, असं म्हणतात. किम यांच्या आधी हे दोन्ही नेतेसुद्धा प्रवास करणं टाळत असतं आणि अगदीच गरजेचं असेल, तरच देशातून बाहेर जात असत. शक्य तितका प्रवास हे दोन्ही नेतेही ट्रेननेच करायचे.
रशियाकडून गिफ्ट म्हणून मिळाली होती ट्रेन
सोवियत नेते जोसेफ स्टॅलिन यांनी पन्नासच्या दशकामध्ये किम यांच्या आजोबांना एक ट्रेन गिफ्ट म्हणून दिली होती. त्यानंतर १९५० साली कोरियन युद्धादरम्यान किम यांचे आजोबा संग यांनी याच रेल्वेचा वापर आपल्या मुख्यालयाप्रमाणे केला आणि इथूनच ते दक्षिण कोरियाविरुद्ध लढण्याची रणनीती आखत होते. आतल्या बाजूला मजबूत लाकडी बांधकाम असलेली ही ट्रेन किम घराण्याची शाही ट्रेन झाली आहे.
वडिलांचा मृत्यूही रेल्वे प्रवासादरम्यानच
उत्तर कोरियाचे सरकारी माध्यम कोरियन सेंट्रल टेलिव्हिजनने दिलेल्या माहितीनुसार, २०११ मध्ये किम जोंग इल यांचा मृत्यू याच ट्रेनमध्ये काम करताना झाला होता. तेव्हा ते कोणत्यातरी कामासाठी प्योंगयांगमधून बाहेर निघाले होते. याच प्रवासामध्ये त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला.
कोणताही हल्ला होणार नाही
तीन पिढ्यांपासून असलेल्या या रेल्वेची लांबी जवळपास २५० मीटर असून यामध्ये सर्व अत्याधुनिक सुविधा आहे. या गाडीचे सर्व डबे बुलेटप्रूफ आहेत. २००४ मध्ये उत्तर कोरियातलं शहर योंगचोन च्या रेल्वे लाईनवर दारुगोळ्याचा स्फोट झाला यामध्ये १५० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. या स्फोटाच्या काही काळ आधी ही ट्रेन या लाईनवरुन गेली होती. तेव्हापासून या रेल्वेची सुरक्षा आणखी कडक कऱण्यात आली.
उत्तर कोरियाच्या मध्येसुद्धा रेल्वे कुठेही जाणार असेल तर एक दिवस आधीच सर्व लाईन्सची तपासणी केली जाते आणि तो रस्ता ब्लॉक केला जातो. एवढंच नव्हे तर किम जोंग उनने तर अशीही सोय केली आहे की ही ट्रेन निघण्यापूर्वी एक खासगी रेल्वे या रुळावरून जाते आणि सुरक्षा व्यवस्थेची खात्री करते. त्या पाठोपाठ मग किम यांची शाही ट्रेन जाते. या ट्रेनच्या पाठोपाठ आणखी एक ट्रेन जाते, ज्यामध्ये अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था तैनात असते.
चैनीच्या आयुष्याची आवड असलेल्या किम जोंग उन यांची ट्रेनही अत्याधुनिक आहे. यामध्ये २२ डबे आहेत. प्रत्येक डब्यामध्ये भव्य बाथरुम आणि डायनिंग रुमही आहे. प्रवास करणारे लोक शक्यतो किम यांच्या परिवारातले सदस्य असतात किंवा स्वतः किम. त्यांच्यासोबत पोलीस अधिकारी आणि सैन्याचे अधिकारीही असतात. या सर्वांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था या ट्रेनमध्ये असते. या ट्रेनमध्ये जगभरातल्या जवळपास प्रत्येक भागातली स्पेशल डिश मिळते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.