North Korea-South Korea: उत्तर कोरियाने दक्षिण कोरियाला पाठवले कचरा अन् विष्ठेने भरलेले फुगे

North Korea-South Korea: दक्षिण कोरियाने रहिवाशांना फुगे आणि फेकलेल्या वस्तूंपासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे आणि अशी कोणतीही वस्तू दिसल्यास अधिकाऱ्यांना कळवण्याची सूचना दिली.
North Korea-South Korea
North Korea-South Koreaesakal
Updated on

North Korea-South Korea: दक्षिण कोरियाने काल (बुधवार) उत्तर कोरियावर दोन्ही देशांच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात कचरा आणि मलमूत्र असलेले फुगे पाठवल्याचा आरोप केला. त्यांनी ही कारवाई धोकादायक असल्याचे म्हटले आहे. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, मिलिटरी एक्सप्लोसिव्ह ऑर्डिनन्स, केमिकल आणि बायोलॉजिकल वॉरफेअर रिस्पॉन्स टीमला पडलेल्या वस्तूंची तपासणी करून गोळा करण्याचे निर्देश देण्यात आले होते. रहिवाशांना फुगे आणि त्यांच्याद्वारे फेकलेल्या कोणत्याही वस्तूपासून दूर राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच अशी वस्तू दिसल्यास तात्काळ माहिती देण्याच्या सूचना देण्यात आल्या.

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी 150 फुगे दिसले. यातील काही हवेत उडत होते. तर काही जमिनीवर पडले.

बुधवारी, दक्षिण कोरियाच्या सैन्याने काही फोटो जारी केले ज्यात त्यांना बांधलेले फुगे आणि प्लास्टिकच्या पिशव्या दिसत होत्या. इतर फोटोंमध्ये जमिनीवर पडलेल्या फुग्यांभोवती कचरा पसरलेला दिसत होता, त्यातील एका फोटोमध्ये पिशवीवर 'पॉप' हा शब्द लिहिलेला दिसत होता.

North Korea-South Korea
Pune Porsche Accident : जामीन, फौजदारी खटला की बालसुधारगृह? बाल न्याय मंडळातील पर्यवेक्षकांच्या अहवालावर ठरणार पुढील दिशा

उत्तर कोरियाच्या उप संरक्षण मंत्र्यांनी रविवारी एक निवेदन जारी करून 'स्वसंरक्षणासाठी मजबूत शक्ती' वापरण्याचे वचन दिले. उत्तर कोरियाने "घाणेरड्या गोष्टी" उडवल्याच्या प्रत्युत्तरात दक्षिण कोरियाला "कचरा आणि घाणीचे ढीग" पाठवले जातील असा इशारा त्यांनी दिला.

उत्तर कोरियाने दक्षिण कोरियाच्या कार्यकर्त्याच्या फुग्यांबद्दल संताप व्यक्त केला आहे, ज्यात पॉप संगीत व्हिडिओसह यूएसबी मेमरी स्टिक देखील आहेत. 2021 मध्ये बलून लाँचवर बंदी घालण्यात आली होती परंतु नंतर सर्वोच्च न्यायालयाने ते असंवैधानिक घोषित केले. यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उल्लंघन होत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. सीमेच्या दोन्ही बाजूला दोन्ही देशांचे बलाढ्य सैन्य उभे आहेत. उत्तर कोरिया सतत आपल्या शेजाऱ्याला नष्ट करण्याची धमकी देत ​​असतो.

North Korea-South Korea
Mahatma Gandhi: फक्त 'एंटायर पॉलिटिकल सायन्स'च्या विद्यार्थ्यालाच... मोदींनी गांधींबद्दल केलेल्या विधानामुळे राजकारण पेटले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.