South Korea : तीस अल्पवयीन मुलांचे हत्याकांड!उत्तर कोरियातील क्रौर्य,दक्षिण कोरियाचा ड्रामा पाहिल्याची शिक्षा

दक्षिण कोरिया निर्मित ‘के ड्रामा’पाहिल्याबद्दल उत्तर कोरियाच्या हुकुमशहाने तीस अल्पवयीन शालेय विद्यार्थ्यांचे हत्याकांड घडवून आणले. कोरियाचे वर्तमानपत्र जोंगआंग डेलीच्या मते, गेल्या आठवड्यात किम जोंगने केलेले क्रौर्य या आठवड्यात उघडकीस आले.
South Korea
South Korea sakal
Updated on

सोल (दक्षिण कोरिया) : दक्षिण कोरिया निर्मित ‘के ड्रामा’पाहिल्याबद्दल उत्तर कोरियाच्या हुकुमशहाने तीस अल्पवयीन शालेय विद्यार्थ्यांचे हत्याकांड घडवून आणले. कोरियाचे वर्तमानपत्र जोंगआंग डेलीच्या मते, गेल्या आठवड्यात किम जोंगने केलेले क्रौर्य या आठवड्यात उघडकीस आले.

दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरियाचे हाडवैर जगाला ठाऊक आहे. उत्तर कोरियात दक्षिण कोरियात मनोरंजन सामग्री पाहणे बेकायदा आहे. यात दक्षिण कोरियातील लोकप्रिय टेलिव्हिजन मालिकांचाही समावेश आहे. दक्षिण कोरियाची स्थानिक टिव्ही वाहिनी चोसून यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कोरियातील लहान विद्यार्थ्यांनी पेनड्राईव्हमध्ये असलेला ‘के-ड्रामा’ पाहिला. हा पेनड्राइव्ह गेल्या महिन्यात सोलवरून फुग्याने उत्तर कोरियात पाठविण्यात आला होता. परंतु उत्तर कोरियात जपान, कोरिया आणि अमेरिका निर्मित सिनेमा, सांस्कृतिक कार्यक्रम दाखविण्यास मनाई आहे. केवळ रशियाचा सिनेमा किंवा उत्तर कोरियाची मान्यता असलेले चित्रपट प्रसारित करण्यास देशात परवानगी आहे.

उत्तर कोरियाने डिसेंबर २०२० मध्ये प्रतिक्रियावादी विचारसरणी आणि संस्कृती विरोधी कायदा (Reactionary Ideology and Culture Rejection Act) मंजूर केला होता. यानुसार दक्षिण कोरियाचे साहित्य लोकांपर्यंत पोचवणाऱ्यांना मृत्युदंड आणि पाहणाऱ्यांना पंधरा वर्षाची शिक्षा अशी तरतूद केली होती. यातील एका नियमानुसार दक्षिण कोरियाची भाषा आणि गाणे म्हणण्याच्या पद्धतीचा वापर केल्यास दोन वर्षांपर्यंत जबरदस्तीने मोलमजुरी करण्याची शिक्षा दिली जाते.

गेल्या महिन्यांतही १७ वर्षाच्या सुमारे ३० अल्पवयीन मुलांना आजन्म कारावास आणि मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती. बीबीसीच्या एका वृत्तानुसार यावर्षी जानेवारीत दोन अल्पवयीन मुलांकडे कोरियाचा व्हिडिओ सापडला होता. त्यानंतर त्यांना बारा वर्षाची कठोर शिक्षा सुनावण्यात आली. याचवर्षी २२ वर्षाच्या एका मुलाकडे ७० पेक्षा अधिक के पॉप सापडले होते. त्याला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती. तो भीतीने घरातून पळून गेला, मात्र दुसऱ्याच दिवशी त्याचा मृतदेह घरात आढळून आला.

दरम्यान, दक्षिण कोरियाने या हत्याकांडावर थेट भाष्य केले नाही. मात्र एका अधिकाऱ्याचा संदर्भ देत म्हटले, तीन तथाकथित क्रुर कायद्याच्या मदतीने उत्तर कोरियात नागरिकांवर अंकुश बसविण्यात येतो व त्यांना कठोर शिक्षा दिली जात असल्याचे सर्वांनाच ठाऊक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.