गड किल्ल्यांवर पुरलेली पुराण काळातील सोन्याची नाणी, जुने तोफगोळ किंवा जुनी लेणी सापडली अशा घटना आपण ऐकल्या असतील. काहीवेळा सोन्याच्या मुर्त्या सापडल्या अशाही बातम्या आपण वाचल्या असतील. परंतु कधी कोणाला स्वयंपाक घरात एखादा खजाना सापडलाय असं ऐकलं आहे का?
सध्या अशीच एक बातमी समोर येत आहे. नॉर्थ यॉर्कमध्ये असलेल्या एका दाम्पत्याला असाच एक मोठा खजाना सापडला आहे. आपल्या घराची डागडुजी करताना त्यांना किचनमध्येच तब्बल २६४ सोन्याची नाणी सापडली आहेत. ही नाणी जवळजवळ ४०० वर्षाहून अधिक जुनी असल्याची माहिती मिळत आहे. ही सोन्याची नाणी पुरातत्व विभागाच्या तज्ञांनुसार १६१० ते १७२७ ह्या काळातली आहेत.
जेम्स पहिला आणि चार्ल्स पहिला ते जॉर्ज पहिला पर्यंतच्या सर्वांचा कारकिर्दींचा यात समावेश आहे, अशी माहिती पुरातत्व विभागाने दिली आहे. आधी या दाम्पत्याला उत्खनन करतानावाटले की, ती केबलची वायर असेल पण नंतर ते लक्षात आले की ही सोन्याची नाणी आहेत. नशीबाची कडी उघडावी आणि भरगोस खजिना मिळावा असे काहीसे या दाम्पत्याबाबत घडले असल्याने चर्चा सुरु आहे. या जोडप्याने लंडनच्या लिलावकर्त्या स्पिंक अँड सन यांच्याशी संपर्क केला. यावेळी एक तज्ज्ञ हा संग्रह पाहण्यासाठी त्यांच्या घरी गेले.
२६० हून अधिक नाण्यांचा हा शोध ब्रिटनमधील पुरातत्वशास्त्रीय नोंदीतील सर्वात मोठा शोध आहे. हा संपूर्णपणे अविस्मरणीय शोध होता, असे मत तज्ज्ञानी व्यक्त केलं आहे. मालक त्यांच्या घराचा मजला रिकामा करत असताना त्यांना डायट कोकच्या कॅनच्या आकाराचे भांडे सापडले. सोने लिलाव करणारा ग्रेगरी एडमंड यांनी म्हटलंय आहे की, जेव्हा तज्ञांनी त्यातील सामग्री पाहिली तेव्हाच त्यांना कळले की ते £250,000 (रु. 2.3 कोटी) किमतीच्या वर जगत होते.
याविषयी बोलत असताना एडमंड म्हणाले, 18 व्या शतकाच्या सुरूवातीस, जेव्हा त्यांच्याकडे बँका आणि नोटा होत्या तेव्हा कोणीतरी बरीच नाणी पुरण्याचा निर्णय का घेतला हा प्रश्नही यातून उपस्थित होतोय. ज्या गोष्टींचा साठा करायचा होता, त्या अशा गाडल्या का असतली असाही एक सवाल त्यांनी उपस्थित केलाय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.