मास्क लावून जेवायचं कसं? यावर 'इटिंग मास्क'चा भन्नाट उपाय

मास्क लावून जेवायचं कसं? यावर 'इटिंग मास्क'चा भन्नाट उपाय
Updated on

सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतांना दिसत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत सगळ्यांना मास्क वापरणं बंधनकारक झालं आहे. देश असो वा विदेश सध्याच्या काळात प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मास्क हा सक्तीने दिसून येतो. परंतु, अनेकदा मास्क लावल्यामुळे कान दुखणे, नाकावर वळ उठणे अशा समस्या जाणवतात. तर, सार्वजनिक ठिकाणी वावरतांना किंवा जेवतांनादेखील सतत मास्क लावल्यामुळे अडचणी येतात. त्यामुळेच या सगळ्या त्रासावर मॅस्किकोमधील एका व्यक्तीने भन्नाट शक्कल लढवली आहे. या व्यक्तीने चक्क Eating Mask तयार केला आहे. हा मास्क Nose Mask म्हणूनही सध्या चर्चेत आहे.

सध्या सोशल मीडियावर दोन वयस्क व्यक्तींचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यामध्ये या दोघांनीही केवळ नाकावरच मास्क परिधान केला आहे.  या मास्कमध्ये केवळ नाकाचा भाग झाकला जात असून तोंडाजवळ मास्क येत नाहीये. त्यामुळे कोणतेही खाद्यपदार्थ खातांना वारंवार मास्क काढण्याची गरज नसल्याचं दिसून येत आहे.

या दोन्ही व्यक्ती बसलेल्या ठिकाणी एका टेबलावर या मास्कचं कव्हर दिसत असून त्यावर Nose Only Mask म्हणजे केवळ नाकाचा मास्क असं लिहिलं आहे. त्यामुळे सध्या या नव्या डिझाइनच्या मास्कची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

दरम्यान, Nose Only Mask पूर्वी सोन्याचे किंवा डायमंडचे मास्कही बाजारात आल्याचं पाहायला मिळालं आहे. विशेष म्हणजे आजकाल लग्नसराईसाठी खास नवनव्या डिझाइनचेही मास्क उपलब्ध आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.