लंडन : जर्मनीचा हुकूमशहा हिटलर आणि अमेरिकेवरील 9/11 च्या दहशतवादी हल्ल्यांची अचूक भविष्यवाणी करणाऱ्या फ्रेंच भविष्यवक्ता नॉस्ट्रेडॅमसने अशा अनेक भविष्यवाण्या केल्या आहेत. त्यापैकी अनेक खऱ्याही झाल्या आहेत. त्यामुळे त्याने केलेली आणखी एक भविष्यवाणी सध्या चर्चेत आली आहे.
नॉस्ट्रेडॅमसने म्हटल्याप्रमाणे, 2021 हे वर्ष विनाशकारी घटनांनी भरलेले असणार आहे. 2021 मध्ये पृथ्वीवर मेंदूत मायक्रोचिप लावलेले सैनिक पाहायला मिळतील. इतकेच नाही तर पृथ्वीला एक लघुग्रहही धडकेल, ज्यामुळे संपूर्ण जगाचा नाश होऊ शकतो.
१४ डिसेंबर १५०३ रोजी फ्रान्समध्ये जन्मलेल्या नॉस्ट्रेडॅमसने १५५५ मध्ये श्लोक आणि कवितांच्या माध्यमातून हजारो भविष्यवाणी केल्या आहेत. त्यातील बऱ्याच खऱ्याही ठरल्या आहेत. नॉस्ट्रेडॅमसने सन ३७९७ पर्यंतचे भविष्य वर्तविले आहे. २०२१ या वर्षाचे भविष्य वर्तविताना त्याने हे वर्ष अतिशय वाईट असू शकते आणि यावर्षी एक लघुग्रह पृथ्वीला धडकेल, असे सांगितले आहे.
६ मे २०२१ हा दिवस ठरणार महत्त्वाचा
६ मे २०२१ या दिवशी आकाशात आगीचे गोळे दिसतील तसेच आकाशात एक ठिणगीही दिसून येईल. लघुग्रहावर लक्ष ठेवून बसलेल्या शास्त्रज्ञ म्हणतात की, २००९ KF1 हा लघुग्रह ६ मे २०२१ या दिवशी पृथ्वीला धडकण्याची शक्यता आहे. तसेच सैनिकांच्या डोक्यात मायक्रोचिप बसवण्याचे तंत्र विकसित होईल. सैनिकांसाठी वापरल्या जाणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी क्रांती होईल.
नॉस्ट्रेडॅमसने केलेली ही भविष्यवाणी चीनकडे इशारा करते. चीन आपले सैन्य पीएलएचे आधुनिकीकरण करण्याच्या प्रयत्नात आहे. चीन सुपर सोल्जर बनवण्याचा प्रयत्न करत आहे, जो कॅप्टन अमेरिका या चित्रपटातील सुपरहिरोसारखा सामर्थ्यवान असेल. चीनला अमेरिका आणि संपूर्ण पृथ्वीवर आर्थिक, संरक्षण आणि तांत्रिकदृष्ट्या वर्चस्व गाजवायचे आहे.
संपूर्ण जग संपेल?
नॉस्ट्रेडॅमसने असाही दावा केला आहे की, रशियन शास्त्रज्ञ जैविक शस्त्र तयार करतील, ज्यामुळे संपूर्ण मानवजात नष्ट होऊ शकते. काही तरुण द्वेषाने अर्धमेले होतील. त्यांच्यामुळे इतर लोकांना चमकण्याची संधी मिळेल. तसेच काही अशुभ घटना घडतील. पालकवर्ग चिरंतन दु:खामध्ये बुडून जातील. कुणी महान व्यक्ती जिवंत राहणार नाही, सर्व जग संपेल.'
२०२१ मध्ये जगातील काही भागांत मोठा भूकंप होईल, असंही भविष्य नॉस्ट्रेडॅमसने वर्तवलं आहे. लंडनमधील भीषण आग आणि हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलरचा उदय याबाबत त्याने केलेली भविष्यवाणी अचूक ठरली आहे. नॉस्ट्रेडॅमसने फ्रेंच राज्यक्रांती आणि अणुबॉम्ब बनविण्याचा अचूक अंदाज वर्तविला होता. तर १९९९ मध्ये पृथ्वीच्या नाशाची भविष्यवाणी पूर्णपणे चुकीची ठरल्याचे सिद्ध झाले.
- जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.