नॉस्ट्रॅडॅमसची २०२४ बद्दलची 'ती' भविष्यवाणी ठरली खरी! जगावर येणार मोठं संकट, भारत अन् चीनमधून सुरुवात?

Nostradamus prediction for 2024 becomes true : नॉस्ट्रॅडॅमसने ४५० वर्षांपूर्वी आपल्या पुस्तकात अनेक भविष्यवाण्या करून ठेवल्या आहेत. त्यापैकी अनेक गोष्टी खऱ्या झाल्याचे देखील सांगितले जाते.
Nostradamus prediction for 2024
Nostradamus prediction for 2024
Updated on

नॉस्ट्रॅडॅमसने ४५० वर्षांपूर्वी आपल्या पुस्तकात अनेक भविष्यवाण्या करून ठेवल्या आहेत. त्यापैकी अनेक गोष्टी खऱ्या झाल्याचे देखील सांगितले जाते. हिटलरचा उदय, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनडी यांची हत्या, कोरोना महामारीची सुरूवात या त्यापैकी काही असल्याचा दावा केला जातो. यादरम्यान आता २०२४ मध्ये नॉस्ट्रॅडॅमसची आणखी एक भविष्यवाणी खरी झाल्याचे सांगितले जात आहे.

२०२४ साठी करण्यात आलेल्या आपल्या भविष्यवाणीत नॉस्ट्रॅडॅमसने 'कोरडी जमीन आणखी कोरडी होईल आणि जेव्हा असे होईल तेव्हा भयानक पूर येईल.' असं म्हटलं होतं. सध्या भारत आणि चीनमध्ये हीच परिस्थिती पाहायला मिळतत आहे. या दोन्ही ठिकाणी भीषण उष्णतेनंतर आता भीषण पूर आला आहे. त्यामुळे ही जगावरील संकटाची सुरूवात आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आशिया खंडात वर्षातील गा काळ हा मॉन्सून आणि वादळांचा कालावधी असतो, मात्र जागतीक तापमानवाढ आणि इतर कारणांमुळं या वादळांची तिव्रता खूपच वाढली आहे. त्यामुळे प्रचंड पाऊस पडून भूस्खलन आणि पूराच्या घटना वाढल्या आहेत. पीकांचे नुकसाना होत आहे, लोक बेघर होत आहेत.

Nostradamus prediction for 2024
Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी शरद पवारांची ताकद वाढली! सदाभाऊ खोतांच्या पक्षातील बडा नेता लागला गळाला

भारतात केरळमधील वायनाडमध्ये तुफान पाऊस झाल्याने भूस्खलनाची घटना घडली. यामुळे शेकडो जणांना आपला जीव गमवावा लागला. या दुर्घटनेत आतापर्यंत ३६१ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर २००हून अधिक जण बेपत्ता आहेत.

चीनमध्येही पूराचा हाहाकार!

चक्रीवादळ गेमीमुळे फिलीपीन्समध्ये ३० हून जास्त आणि तैवानमध्ये १० लोकांचा मृत्यू झाला आहे. चीनच्या अनेक भागात पूराने थैमान घातले आहे. हुनान प्रांतात अनेक दिवसांच्या पावसानंतर रविवारी सकाळी एका पर्यटनस्थळावर भूस्खलन झाल्याने १५ जण मृत्यूमुखी पडले आहेत. तर जिक्सिंग शहरात पुरामुळे ३० जण दगावले तर ३५ जण बेपत्ता आहेत.

Nostradamus prediction for 2024
Haniyeh Assassination : हमासचा प्रमुख हानियाची भारतीय 'अमित नाकेश'ने केली हत्या? तुर्की मीडियाचा खळबळजनक दावा, पण...

नॉस्ट्रॅडॅमस कोण होता?

नॉस्ट्रॅडॅमस हा एक फ्रेंच ज्योतिषी असून त्याने सुमारे ५०० वर्षांपूर्वी त्यांचे पुस्तक लेस प्रोफेटीज प्रकाशित केले. या पुस्तकात त्याने भविष्याचे वेध घेणारे तब्बल ९४२ अंदाज वर्तवले आहेत. त्याने मोंटपेलियर यूनिव्हर्सीटीमधून मेडिकलचे शिक्षण घेतले होते. १५५६ मध्ये त्याचा मृत्यू झाला मात्र अजही त्याच्या पुस्तकात वर्तवण्यात आलेले अंदाज अचूक मानले जातात.

Nostradamus prediction for 2024
Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी महायुतीत राजकीय भुकंप होणार? ठाकरे-पवार मोठा धक्का देण्याच्या तयारीत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.