Novichok: नवाल्नींना संपवण्यासाठी पुतिन यांच्याकडून शीतयुद्ध काळातील रासायनिक अस्त्राचा वापर? किती आहे घातक?

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे राजकीय विरोधक अलेक्सी नवाल्नी यांचा गूढ पद्धतीने मृत्यू झाला आहे. त्यामुळे रशियात अंशाततेचे वातावरण आहे. (Novichok nerve agent the weapon of the Cold War)
alexy nawalny. vladimir Putin
alexy nawalny. vladimir Putin
Updated on

मॉस्को- रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे राजकीय विरोधक अलेक्सी नवाल्नी यांचा गूढ पद्धतीने मृत्यू झाला आहे. त्यामुळे रशियात अंशाततेचे वातावरण आहे. नवाल्नी यांच्या हत्येमागे पुतिन यांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जातो. पुतिन यांनी आतापर्यंत आपल्या विरोधकांना मारण्यासाठी नोविचोक या विषाचा वापर केल्याचा दावा केला जातो.

नोविचोक हे एक रासायनिक अस्त्र आहे. याच्यावर उपचार नसल्यात जमा आहे. नोविचोकचा रशियामध्ये अर्थ नवागंतूक (newcomer) असा आहे. या विषाचे निदान करणे कठीण मानले जाते. त्यामुळे जेव्हा एखाद्यावर या विषाचा प्रयोग केला जातो, तेव्हा त्याचे वाचणे जवळपास अशक्य असते.(Novichok nerve agent the weapon of the Cold War with which Navalny was accused of killing vladimir Putin)

alexy nawalny. vladimir Putin
Explained: पुतिन आजन्म राहू शकतात अध्यक्ष, मग निवडणुकांचा घाट कशासाठी? जाणून घ्या

शीतयुद्धात झाली होती निर्मिती

नोविचोक नर्व एजेंटला १९७० ते १९८० या काळात विकसित करण्यात आले होते. याला फोलिएंट म्हणून विकसित करण्यात आलं होतं. नोविचोकचा वापर युद्धादरम्यान केल्याचा आतापर्यंत पुरावा नाही. पण, मार्च २०१८ मध्ये ब्रिटनच्या सैलिसबरी शहकात स्किरपाल आणि त्यांच्या मुलीवर या विषाचा प्रयोग करण्यात आला होता. सुदैवाने दोघे यातून वाचले. त्यानंतर ब्रिटिश सरकारने रशियावर हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता.

alexy nawalny. vladimir Putin
"मोदींना घाबरवता अन् धमकावले जाऊ शकत नाही..."; पुतिन यांचा AI Video व्हायरल

किती धोकादायक आहे Novichok?

अमेरिकेकडे असलेले नर्व एजेंट VX पेक्षा रशियाकडील Novichok १० पटीने अधिक प्रभावी आहे. यावरुन याची तीव्रता लक्षात येईल. २०१७ मध्ये उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन यांनी आपल्या सावत्र भावाला मारण्यासाठी अमेरिकेच्या VX विषाचाच वापर केला होता.

नोविचोक विषाची बाधा झाल्यास त्याचा परिणाम व्यक्तीच्या मांसपेशीवर होतो. एखाद्या झुरळावर जसा विषाचा परिणाम होतो तसाच त्याचा व्यक्तीवर परिणाम होतो. विष दिले गेलेल्या व्यक्तीला अंग प्रचंड दुखणे, हृदय विकाराचा झटका, श्वास घेण्यास त्रास अशा अडचणी जाणवतात. विष जास्त दिले असल्यास दोन मिनिटात मृत्यू होतो. पण, विषाचे प्रमाण कमी दिले असल्यास मृत्यूला वेळ लागतो. पण, जीव जाताना वेदना नक्की होतात. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.