अफगाणिस्तानातून पळून जाणारे हजारो लोक दररोज शेजारच्या इराणमध्ये आश्रय घेत आहेत.
अफगाणिस्तान : अफगाणिस्तानातून (Afghanistan) पळून जाणारे हजारो लोक दररोज शेजारच्या इराणमध्ये (Iran) आश्रय घेत आहेत आणि यामुळं युरोपमधील निर्वासितांच्या संकटाचा प्रश्न अधिक गडद होताना दिसतोय. देशातील एका उच्च अधिकाऱ्यानं ही माहिती दिलीय. नॉर्वेजियन रिफ्यूजी कौन्सिलचे (NRC) सरचिटणीस जेन इंग्लंड (General Secretary Jane England) यांनी नुकतीच अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या पूर्व इराणमधील करमन प्रांताजवळ निर्वासितांची भेट घेतली. अफगाणिस्तानातील लोक आश्रयाच्या शोधात इराणमध्ये पळून जात राहिल्यास, त्याचा युरोपवर (Europe) मोठा परिणाम होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिलाय.
बुधवारी, निर्वासितांच्या भेटीच्या शेवटच्या दिवशी जेन इंग्लंड यांनी तेहरानमधील एजन्सीला सांगितलं, की तालिबानच्या राजवटीत अफगाणिस्तानातून पळून जाणाऱ्यांना मदत करणं आवश्यक आहे. अनेक अफगाण निर्वासितांनी इराणला जात असल्याचं त्यांच्या नातेवाईकांना सांगितलंय. 15 ऑगस्ट रोजी तालिबाननं काबूलचा ताबा घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणावर हवाई निर्वासन मोहीम सुरू झाली.
ते पुढे म्हणाले, 120,000 अमेरिकन, अफगाण आणि इतरांना हवाई मार्गानं अफगाणिस्तानातून बाहेर काढण्यात आलंय, परंतु तरीही हजारो लोक बाहेर पडत आहेत. त्यापैकी बरेच जण सीमा भागात गेले असून संस्थांकडून मदत घेत आहेत. NRC च्या माहितीनुसार, तालिबानच्या ताब्यानंतर 3,00,000 अफगाण लोक अफगाणिस्तानातून इराणमध्ये पळून गेले आहेत. अफगाणिस्तानमध्ये हिवाळी हंगाम सुरू होत असून निर्वासितांना आश्रय देण्यासाठी योग्य व्यवस्था नसल्याने इराणमध्ये आश्रयाच्या शोधात आणखी लोक येण्याची शक्यता असल्याचं इंग्लंड यांनी सांगितलं. अफगाणिस्तान आणि इराणसारख्या शेजारील देशांना थंडीच्या हंगामापूर्वी मदत वाढवण्याचं आवाहन जेन यांनी श्रीमंत देशांना केलंय. असाच काहीसा प्रकार पाकिस्तानातही पाहायला मिळतोय. येथेही हजारो अफगाणी पोहोचत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.