पाकिस्तानमध्ये गाढवांची संख्या वाढली, चीन घेण्यास तयार; ड्रॅगनला गाढवं का हवी आहेत?

China Want donkeys from Pakistan: पाकिस्तानमध्ये २०२३-२४ मध्ये एक सर्वेक्षण करण्यात आले होते. यात गाढवांची संख्या उल्लेखनीय रित्या वाढल्याचं समोर आलं आहे.
पाकिस्तानमध्ये गाढवांची संख्या वाढली, चीन घेण्यास तयार; ड्रॅगनला गाढवं का हवी आहेत?
Updated on

इस्लामाबाद- पाकिस्तानची आर्थिक अवस्था सध्या कमकूवत आहे. महागाई प्रचंड वाढली आहे. शिवाय, अमेरिकेसारख्या देशांकडून मिळणाऱ्या मदतीवर पाकिस्तानला अवलंबून राहावं लागत आहे. अशा पाकिस्तानमध्ये २०२३-२४ मध्ये एक सर्वेक्षण करण्यात आले होते. यात गाढवांची संख्या उल्लेखनीय रित्या वाढल्याचं समोर आलं आहे.

माहितीनुसार, पाकिस्तानमध्ये सध्या ६० लाखांपेक्षा जास्त गाढवं आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत पाकिस्तानमध्ये गाढवांची संख्या १.७२ टक्क्यांनी वाढली आहे. गाढवांची संख्या वाढली असली तरी देशाची आर्थिक स्थिती जशीच्या तशी आहे. उलट त्यामध्ये बिघाडच जास्त होत आहे. एकंदरीत पाकिस्तानमध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त गाढवं आहेत. दुसरीकडे, चीनला गाढवं कमी पडत आहेत. त्यामुळे चीन गाढवं कुठे मिळतील याच्या शोधात आहे.

पाकिस्तानमध्ये गाढवांची संख्या वाढली, चीन घेण्यास तयार; ड्रॅगनला गाढवं का हवी आहेत?
Pakistan PM : मोदीवर प्रेम नाही तर नाईलाज...; शाहबाज शरीफ यांच्या शुभेच्छांच्या मेसेजवर पाकच्या संरक्षण मंत्र्याचं स्पष्टीकरण

पाकिस्तानमध्ये आर्थिक वर्षात २.४ टक्क्यांच्या आर्थिक वृद्धीचा अंदाव वर्तवण्यात आला आहे. देशाने ३.५ टक्क्यांच्या आर्थिक वृद्धीची अपेक्षा ठेवली आहे. मात्र, ते साध्या होण्याची सुतराम शक्यता नाही. गाढवांची वाढती संख्या ग्रामीण आणि कृषी क्षेत्रामधील वाढीचे संकेत देते. मात्र, पाकिस्तानमध्ये परिस्थिती एकदम उलटी आहे. पाकिस्तान समोर आर्थिक संकट आ वासून उभे आहे.

चीनला का गरज आहे गाढवांची ?

चीनला अधिकाधिक गाढवांची गरज पडत आहे. चीनध्ये e-Jiao नावाचे एक औषध मोठ्या प्रमाणात वापरले जाते. या औषधासाठीच गाढवांची मोठ्या प्रमाणात हत्या केली जाते. गाढवाच्या चमडीपासून हे औषध बनवलं जातं. या औषधामुळे चीनच्या लोकांमधील रक्ताच्या कमतरतेची समस्या दूर झाल्याचं सांगितलं जातं. याशिवाय, प्रतिकार क्षमता वाढते असा दावा केला जातो. इतर काही आजारासाठी देखील हे औषध वापरलं जातं.

पाकिस्तानमध्ये गाढवांची संख्या वाढली, चीन घेण्यास तयार; ड्रॅगनला गाढवं का हवी आहेत?
Pakistan Fan : 'ट्रॅक्टर विकून मॅच पाहायला आलो पण लाज वाटली...' Ind vs Pak सामन्यानंतर चाहत्याचा 'तो' व्हिडिओ व्हायरल

e-Jiao नावाचे औषध बनवण्यासाठी ड्रॅगनला मोठ्या प्रमाणात गाढवांची आवश्यकता असते. पाकिस्तानमध्ये गाढवांची संख्या मुबलक आहे. त्यामुळे चीनसोबत करार करून पाकिस्तान गाढवं विकू पाहात आहे. यासाठी पाकिस्तानचे प्रयत्न देखील सुरू आहेत.

पाकिस्तानला गाढवांचा आर्थिक आधार

गाढवांना पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. विशेष करुन ग्रामीण भागात यांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. सामान वाहून नेणे आणि परिवहनासाठी गाढवांचा उपयोग होते. याशिवाय कृषी क्षेत्रात वेगवेगळ्या कारणासाठी गाढवांचा उपयोग होतो. ज्या ठिकाणी वाहतुकीची समस्या आहे अशा ठिकाणी गाढवं खूप कामाला येतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.