बराक ओबामांनी ट्रम्प यांच्यावर डागली तोफ; म्हणाले...

Trump-Obama
Trump-Obama
Updated on

वॉशिंग्टन : सध्या जगभरात कोरोनाने थैमान घातले असून या महामारीमुळे जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेचे कंबरडेच मोडले आहे. अमेरिका प्रशासन कोरोनाला आळा घालण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर तोफ डागली आहे. 

कोरोनाला रोखण्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे पूर्ण प्रशासन अपयशी ठरले असल्याची टीका ओबामांनी केली आहे. तसेच कोरोना या जागतिक महामारीला ओबामांनी 'गोंधळ निर्माण करणारी आपत्ती' असे संबोधले आहे. माजी प्रशासकीय सदस्यांसोबत ओबामा यांनी वेब कॉलद्वारे संवाद साधला. तो संवाद शुक्रवारी (ता.८) लीक झाला आहे. 

यावेळी ट्रम्प प्रशासनावर टीका करताना ओबामा म्हणाले की, माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मायकेल फ्लिन यांना आरोपातून मुक्त करण्याचा निर्णय ट्रम्प यांनी घेतला होता. मात्र ट्रम्प यांचा निर्णय अमेरिकेसाठी धोकादायक ठरू शकतो, असे ओबामांचे म्हणणे आहे. रशियाने केलेल्या तपासणीत फ्लिन एफबीआयशी खोटे बोलले असल्याने त्यांना दोषी ठरविण्यात आले, असे म्हटले होते.    

तसेच नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत ट्रम्प यांच्या विरोधात उभे असलेल्या जो बिडेन यांना पाठिंबा देण्याचे आवाहनही ओबामा यांनी यावेळी केले आहे. 

दरम्यान, कोरोना विषाणूमुळे अमेरिकेतील १३ लाख लोक संक्रमित झाले असून आतापर्यंत ७७ हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाला रोखण्यात अमेरिकी प्रशासन अपयशी ठरल्याने ट्रम्प यांच्या नेतृत्वावर आणि या भीषण संकटाला तोंड देण्याच्या त्यांच्या भूमिकेवर टीका होत आहे. खुल्या बाजारातून आणि परदेशातून वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यासाठी एकमेकांविरुद्ध बोली लावल्याचे आरोपही ट्रम्प यांच्यावर केले जात आहेत.  

फेब्रुवारी महिन्यात जेव्हा कोरोना अमेरिकेत येऊन धडकला तेव्हा त्याला आळा घालण्यासाठीचा महत्त्वपूर्ण वेळ वाया घालवला. त्यानंतर संशोधन, वैद्यकीय साधनांची जमवाजमव करणे आणि राष्ट्रीय रणनीति तयार करण्याबाबत ट्रम्प प्रशासनाने खूप कमी काम केले, असे टीकाकारांचे म्हणणे आहे. 

कोरोनासारख्या जागतिक महामारीने देशाला विळखा घातल्यानंतर नेतृत्वाबाबत येणाऱ्या अशाप्रकारच्या प्रतिक्रिया या कलंकित स्वरुपाच्या असतात. आणि त्याचे दूरगामी पडसाद उमटत जातात. जगभरात नावाजलेल्या सरकारबद्दल असे घडणे हे त्याहून वाईट आहे, असेही ओबामांनी म्हटले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.