Nigeria Accident: तेल टँकर-ट्रकची धडक, 48 जण ठार; 50 गुरे जिवंत जळाली

Nigeria Oil Tanker Accident: नायजेरियामध्ये एका तेलाच्या टँकरची ट्रकला धडक बसल्याने भयंकर स्फोट झाला. या स्फोटात सुमारे 48 लोकांचा मृत्यू झाला असून, सुमारे 50 गुरे जिवंत जळली आहेत.
Nigeria Accident
Nigeria AccidentEsakal
Updated on

पश्चिम आफ्रिकेतील देश नायजेरियामध्ये एका तेलाच्या टँकरची ट्रकला धडक बसल्याने भयंकर स्फोट झाला. या स्फोटात सुमारे 48 लोकांचा मृत्यू झाला असून, सुमारे 50 गुरे जिवंत जळली आहेत.

नायजरचे पोलीस महासंचालक अब्दुल्लाही बाबा-अरब यांच्या म्हणण्यानुसार, ट्रक नायजर राज्याच्या अगाई येथे गुरे घेऊन जात असताना एका तेलाच्या टँकरला धडकली आणि स्फोटानंतर सुमारे 50 गुरे जिवंत जळाली. अपघातस्थळी शोध आणि बचाव कार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

बाबा-अरब यांनी सुरुवातीला घटनास्थळावरून 30 मृतदेह सापडल्याचे सांगितले होते, परंतु नंतरच्या निवेदनात त्यांनी सांगितले की, त्यांना आणखी 18 मृतदेह सापडले आहेत. ते म्हणाले की मृतांचे सामूहिक दफन करण्यात आले आहे.

अपघातानंतर लोकांमध्ये वाढत असलेला संताप पाहून नायजर राज्याचे गव्हर्नर मोहम्मद बागो यांनी नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले.

नायजेरियामध्ये माल वाहतूक करण्यासाठी सक्षम रेल्वे यंत्रणा नाही, त्यामुळे आफ्रिकेच्या सर्वाधिक लोकसंख्याच्या देशात जीवघेणे ट्रक अपघात सतत होत असतात.

नायजेरियाच्या फेडरल रोड सेफ्टी कॉर्प्सच्या मते, 2020 मध्ये पेट्रोल टँकरचे 1531 अपघात झाले, ज्यामध्ये 535 लोकांचा मृत्यू आणि 1142 लोक जखमी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.