OMG! 20 मिनिटांत 4 बाटल्या पाणी प्यायल्याने महिलेच्या पोटात तयार झालं विष,अती पाण्यामुळेही होतो मृत्यू, जाणून घ्या

जास्त पाणी प्यायल्याने एखाद्या व्यक्तीच्या पोटात विष बनू शकते
Water Drinking Habit
Water Drinking Habitesakal
Updated on

Water Causes Death : पाणी हे जीवन आहे. तुम्हाला हे माहित असेलच पण पाणी जीवही घेतं हे तुम्हाला माहिती आहे का? आता तुम्ही विचार कराल पाणी जीव घेतं म्हणजे महापूर, नदी, समुद्र असं काहीतरी असेल. पण आपण या कोणत्याही गोष्टीबद्दल बोलत नसून पिण्याच्या पाण्याबद्दल बोलत आहोत.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, जास्त पाणी प्यायल्याने एखाद्या व्यक्तीच्या पोटात विष बनू शकते आणि त्याचा जीव घेऊ शकते. होय, अशीच एक घटना अमेरिकेत घडली आहे, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. जास्त पाणी प्यायल्याने येथे एका महिलेचा मृत्यू झाला आहे. ऍशले समर्स असं या महिलेच नाव आहे.

Water Drinking Habit
Glowing Skin Tips: चेहऱ्यावर झटपट ग्लो हवाय? मग ट्राय करा हे फेसपॅक

युनिलाड नावाच्या वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, ही महिला आपल्या कुटुंबासोबत मॉन्टीसेलो जवळील लेक फ्रीमन येथे सुट्टीसाठी गेली होती, तिथे अचानक तिची तब्येत बिघडली. तिला चक्कर येऊ लागली, डोकेदुखी सुरू झाली आणि तहान लागल्याची तक्रारही केली. अशा स्थितीत तिने काहीही विचार न करता पाणी पिण्यास सुरुवात केली आणि सुमारे 20 मिनिटांत अर्धा लिटर पाण्याच्या चार बाटल्या एक एक करून प्यायल्या. संध्याकाळी घरी पोहोचल्यावर ती बेशुद्ध पडली.

Water Drinking Habit
Smartphone Tips : फोन रात्रभर चार्ज करणे योग्य की अयोग्य?

मेंदूला सूज आली होती

यानंतर कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात नेले, मात्र दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला होता. गरजेपेक्षा जास्त पाणी प्यायल्याने तिच्या शरीरात पाण्याचं विष तयार झालं आणि मेंदूला सूज आली अशी माहिती डॉक्टरांनी दिली. महिलेच्या शरीरात खूप पाणी होतं, पण सोडियम पुरेस नव्हतं, असंही त्यांनी सांगितलं.

Water Drinking Habit
Vastu Tips : समस्या अनेक उपाय फक्त एक, भगवान शंकरांचा फोटो करेल तुमच्या अनेक समस्यांच निवारण!

असा प्रकार यापूर्वीही समोर आला आहे

जास्त प्रमाणात पाणी पिणे एखाद्यासाठी जीवघेणे ठरण्याची ही पहिलीच घटना नाही. अलीकडेच मिशेल फेअरबर्न नावाच्या एका टिकटॉकर व्यक्तीसोबत असंच काहीसं घडलं होतं. तिने 12 दिवस सतत 4-4 लिटर पाणी प्यायले, त्यामुळे तिला सोडियम डेफिशियन्सी नावाचा आजार झाला. मात्र वेळीच उपचार मिळाल्याने तिचे प्राणही वाचले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.