कोरोनाचा (corona) नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनने (omicron) सध्या जगभरात धुमाकूळ घातला आहे. भारत वगळता बहुतांश देशात ओमिक्रॉनपासून बचाव होण्यासाठी कोरोनाच्या दोन लसीनंतर (corona vaccination) बूस्टर डोसचा देण्यात येतोय. पण आता बूस्टर डोसही ओमिक्रॉनवर प्रभावी ठरताना दिसत नाही.
बूस्टर डोस घेतलेल्या दोघांना Omicronची लागण
सिंगापूरमध्ये बूस्टर डोस घेतलेल्या दोन जणांना Omicron प्रकाराचे प्राथमिक अहवाल सकारात्मक आले आहेत. आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की विमानतळावरील चाचणी दरम्यान 24 वर्षीय मुलीच्या प्राथमिक रिपोर्टमध्ये ओमिक्रॉनची पुष्टी झाली आहे. त्याचवेळी 6 डिसेंबरला जर्मनीहून परतलेल्या एका प्रवाशामध्येही ओमिक्रॉन सापडला आहे. या व्यक्तीने कोविड-19 लसीचा तिसरा डोसही घेतला होता.
ओमिक्रॉनचे रुग्ण वाढण्याची भीती
सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, जगभरात ओमिक्रॉन प्रकाराचा संसर्ग पाहता, देशात ओमिक्रॉनचे रुग्ण वाढण्याची भीती आहे. मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात असे सांगण्यात आले की, ओमिक्रॉनची लक्षणे दिसू लागल्यानंतर दोन्ही संक्रमितांना राष्ट्रीय संसर्गजन्य रोग केंद्रात ठेवण्यात आले आहे, जिथे त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. त्याचवेळी त्याच्या संपर्कात येणाऱ्या लोकांना १० दिवस आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार आहे.
87 टक्के लोकांना बूस्टर डोस
सिंगापूरमधील 87 टक्के लोकांना बूस्टर डोस म्हणजेच कोरोनाची तिसरी लस मिळाली आहे सिंगापूर हा जगातील सर्वोत्तम लसीकरण मोहिमा असलेल्या देशांपैकी एक आहे. येथे 87 टक्के लोकांना पूर्णपणे लसीकरण करण्यात आले आहे. त्याच वेळी, सुमारे 29 टक्के लोकांना बूस्टर डोस देखील दिला गेला आहे. सरकार लवकरच 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोरोनाचा डोस सुरू करणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.