ओमिक्रॉन संसर्ग पोहचला ५८ देशांत

दक्षिण आफ्रिकेत २४ नोव्हेंबर रोजी ओमिक्रॉन आढळल्यानंतर या संसर्गाने ५८ देशांपर्यंत धडक मारली आहे. पाकिस्तानमध्ये एका महिलेत ओमिक्रॉनचे विषाणू आढळून आले.
nucleic acid test
nucleic acid testSakal
Updated on

वॉशिंग्टन/ नवी दिल्ली - दक्षिण आफ्रिकेत २४ नोव्हेंबर रोजी ओमिक्रॉन आढळल्यानंतर या संसर्गाने ५८ देशांपर्यंत धडक मारली आहे. पाकिस्तानमध्ये एका महिलेत ओमिक्रॉनचे विषाणू आढळून आले. जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या साप्ताहिक अहवालात आतापर्यंत ५८ देशांत ओमिक्रॉनचा संसर्ग पसरल्याचे म्हटले आहे. परदेशातून आलेल्या नागरिकांतच ओमिक्रॉनचे लक्षणे आढळून येत असल्याचे नमूद केले आहे. फायजर, बायोएनटेकने मात्र ॲटी कोविड व्हॅक्सिन ओमिक्रॉन संसर्गाला रोखण्यास यशस्वी ठरल्याचा दावा केला आहे.

जर्मनीत कोरोना संसर्गामुळे स्थिती बिकट होत चालली आहे. एका दिवसांतच ५२७ जणांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या १२ फेब्रुवारीनंतर सर्वाधिक आहे. जर्मनीत कोरोना संसर्गाने आतापर्यंत १.०४ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या चोवीस तासात ६९,६०१ नवीन रुग्ण आढळून आले. आतापर्यंत जर्मनीत ६२.२७ लाख जणांना कोरोनाची लागण झाली असून ५२.२५ लाख जण बरे झाले आहेत.

दक्षिण आफ्रिकेत रुग्णसंख्या वाढली दक्षिण आफ्रिकेत कोरोना संसर्गामुळे स्थिती पुन्हा ढासळली आहे. दोन दिवसात रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण दुप्पटीने झाला आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कम्युनिकेबल डिसिजच्या मते, गेल्या चोवीस तासात रुग्णालयात ३८३ जण दाखल करण्यात आले. तर सोमवारी हीच संख्या १७५ होती. दक्षिण आफ्रिकेत एका दिवसात १३,१४७ नवीन रुग्ण आढळून आले. यापैकी ६४ टक्के रुग्ण हे गौतेंग प्रदेशातील आहेत.

nucleic acid test
जगातील तिसरा सर्वात महागडा घटस्फोट! पत्नीने मागितले 5400 कोटी

ओमिक्रॉनमुळे युरोप सावध

युरोपियन हेल्थ संस्थेने युरोपातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता सजग राहण्याचा इशारा दिला आहे. आगामी काळात युरोपीय देशांत कोविड रुग्णांची आणि मृतांची संख्या वाढेल, असा इशारा दिला आहे. लसीकरणाचा वेग वाढवावा, असा सल्ला देण्यात आला आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटने स्थिती आणखीच चिंताजनक झाली आहे, असे म्हटले आहे.

बूस्टर डोसची मागणी वाढली

अमेरिकेत बूस्टर डोस देण्याची मागणी वाढली आहे. ओमिक्रॉनच्या वाढत्या धोक्यामुळे बूस्टर डोस घेण्यासाठी नागरिक रांगा लावत आहेत. अमेरिकेत एका दिवसांत सुमारे १० लाख लोकांनी बूस्टर डोस घेतले आहेत. गेल्या आठवड्यात ७० लाख लोकांनी बूस्टर डोस घेतला होता. अमेरिकी नियामक संस्थेने सप्टेंबर महिन्यांत कोविड लस बूस्टर डोसला मंजुरी दिली आहे.

लशीला हुलकावणी देऊ शकत नाही

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या अन्य व्हेरिएंटच्या तुलनेत ओमिक्रॉन हा अधिक घातक नाही. त्यामुळे संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तीला ओमिक्रॉन हुलकावणी देऊ शकणार नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. नवीन व्हेरिएंटबाबत फारशी माहिती नाही, परंतु प्रारंभीच्या तपासात डेल्टापेक्षा कमी धोकादायक असल्याचे संकेत मिळाले आहेत.

पाकिस्तानात नवीन व्हेरिएंट आढळला

पाकिस्तानातही ओमिक्रॉन संसर्गाने शिरकाव केला आहे. कराची शहरात एका खासगी रुग्णालयात ६५ वर्षी महिलांच्या अंगी ओमिक्रॉनचे लक्षणे आढळून आले आहेत. परदेशातून आलेल्या रुग्णांत कोणतेही लक्षणे नव्हते. आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक चाचण्या करूनही अनेकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले नाहीत. मात्र याच लोकांत ओमिक्रॉनचे लक्षणे आढळून आल्याचे पाकिस्तानच्या आरोग्य विभागाने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.