चीनमध्ये ओमिक्रॉनच्या नव्या सब-व्हेरियंटने चिंता वाढवली; रूग्णसंख्येत वाढ

नव्या विषाणूमुळे येथे जवळपास 13,000 हून अधिक नव्या कोविड संसर्गाची प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
China Covid Updates
China Covid Updatessakal
Updated on

बिजिंग : चीनमध्ये कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटच्या नव्या सब व्हेरिएंटमुळे हाहाकार माजला असून, या विषाणूमुळे येथील कोरोना बाधितांच्या (Corona Cases In China) रूग्णांची संख्या झापाट्याने वाढत आहे. नव्या विषाणूमुळे येथे जवळपास 13,000 हून अधिक नवीन कोविड संसर्ग झालेल्या रूग्णांची नोंद करण्यात आली असून, हे सर्व बाधित रूग्ण ओमिक्रॉन प्रकाराच्या नवीन उपप्रकाराशी संबंधित असल्याचे मत चीनच्या सरकारी मीडियाने व्यक्त केले आहे. (Omicron New Sub Variant Found In China)

China Covid Updates
योगींच्या गोरखपूर मंदिरात चाकूसह घुसणारा आरोपी IITतून इंजिनिअर; दोन जखमी

नवीन व्हेरिएंटच्या उद्रेक, शांघायपासून जवळ असलेल्या शहरात आडलणाऱ्या कोरोना रूग्णांमधील लक्षणे सौम्य कोरोनाच्या लक्षणांपेक्षा वेगळे आहेत. जे ओमिक्रॉन प्रकारच्या BA.1.1 प्रकारापासून विकसित होते. प्राप्त माहितीनुसार ओमिक्रॉनचा उपप्रकार चीनमधील करोना किंवा GISAI, जिथे जगभरातील शास्त्रज्ञ उत्परिवर्तनांचे निरीक्षण करण्यासाठी त्यांनी सिक्वेसन्स केलेला करोना व्हायरस शेअर करतात त्यांच्याकडे सादर केलेल्या इतर करोना व्हायरसशी जुळत नसल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

China Covid Updates
'भारताची स्थिती श्रीलंकेसारखी होईल', PM मोदींच्या बैठकीत अधिकाऱ्यांकडून चिंता व्यक्त

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू

दरम्यान, देशात वाढत्या कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. याशिवाय शांघायमध्ये कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी कशाप्रकारे उपाययोजना केल्या जात आहेत हे पाहण्यासाठी नुकतीच चीनच्या वरिष्ठ नेत्यांकडून पाहणी करण्यात आली आहे. दरम्यान चीनमध्ये शनिवारी आढळलेल्या एकूण 8 हजार रुग्णांपैकी 7,788 रूग्णांना कोणतेही लक्षणे नसल्याचे सांगितले जात आहे. कोरोना रूग्णांचे त्वरित निदान व्हावे यासाठी, सोमवारपासून येथे मोठ्या प्रमाणात चाचण्या सुरु करण्यात आल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.