न्यूयाॅर्क : कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमिक्राॅन जगभरात वेगाने पसरत आहे. अमेरिकेतील (America) स्थिती फारच बिकट आहे. येथे नवीन कोरोना रुग्णांपैकी ७३ टक्के ओमिक्राॅन संक्रमित आहेत. सेंटर फाॅर डिसिज कंट्रोलने (सीडीसी) याबाबत माहिती दिली आहे. सीडीसीने सांगितले, की केवळ एका आठवड्यात ओमिक्राॅनच्या केसेसमध्ये ६ टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली आहे. एका अंदाजानुसार अमेरिकेच्या अनेक भागात हा आकडा मोठा आहे. न्यूयाॅर्कमध्ये ९० टक्के नवीन केसेस मागे ओमिक्राॅन व्हेरिएंट (Omicron Variant) आहे. सीडीसी संचालक डाॅ. राॅशेल वॅलन्स्की म्हणतात, की हा आकडा मोठा आहे. मात्र यात आश्चर्यचकित होण्यासारखे काही नाही. या दरम्यान अमेरिकेत ओमिक्राॅनमुळे पहिला मृत्यू झाला आहे. राॅयटर्स (Reuters) या वृत्तसंस्थेने म्हटले आहे, की अमेरिकेत एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. (Omicron Speedily Spread In America, 73 Percent Patients Infected New Variant)
त्याचे कारण ओमिक्राॅन संक्रमण असल्याचे मानले जात आहे. मात्र अधिकृतरित्या याबाबत आतापर्यंत दुजोरा देण्यात आलेला नाही. ओमिक्राॅन व्हेरिएंट किती घातक आहे? यावर कोरोना लस परिणामकारक आहे की नाही? या प्रश्नांचे उत्तरे मिळालेली नाहीत. मात्र प्रारंभिक अभ्यासानुसार ज्यांनी कोरोनाची दोन्ही लसी घेतल्या आहेत, त्यांना बूस्टर डोस देऊन या संक्रमणापासून वाचवले जाऊ शकते. यामुळेच जगात आता बूस्टर डोसवरुन चर्चा सुरु झाली आहे. काही देशांमध्ये बूस्टर डोसही दिले जात आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनीही ट्विटमध्ये म्हटले आहे, ओमिक्राॅन संक्रमण सतत वाढत चालला आहे.
त्यांना नागरिकांना कोरोना लस, बूस्टर डोस घेण्याची विनंती केली आहे. दक्षिण आफ्रिकेत गेल्या महिन्यात ओमिक्राॅन व्हेरिएंट आढळला होता. त्यानंतर २६ नोव्हेंबर रोजी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) त्यास व्हेरिएंट ऑफ कंसर्न अर्थात चिंताजनक म्हटले होते. त्यानंतर ओमिक्राॅन व्हेरिएंट ९० देशांमध्ये पसरला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.