Omicron: जो बायडेन यांच्या वक्तव्यानं वाढवली चिंता

ओमिक्रॉनच्या (Omicron) पार्श्वभूमीवर अमेरिकेनं कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे.
joe biden - omicron
joe biden - omicronjoe biden america us
Updated on

दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या ओमिक्रॉन (Omicron) या कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटने पुन्हा एकदा जगाला चिंतेत टाकलंय. जगभरातील सर्वच देशांकडून विविध पातळ्यांवर याबाबत खबरदारी घेण्यास सुरुवात झाली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनीही गुरुवारी 'कोरोनाव्हायरसचा ओमिक्रॉन व्हेरीअंट अमेरिकेत खूप वेगाने पसरु शकतो' असा इशारा दिला आहे.

ओमिक्रॉन संकटाच्या पार्श्वभूमीवर बायडेन यांनी अमेरिकेतील नागरिकांना लस घेण्याचे आवाहन केलं आहे. विषाणूपासून बचाव करण्यासाठी लसीकरण आवश्यक असून, ज्यांनी ही लस घेतली नाही त्यांना हिवाळ्यात गंभीर परिणामांना सामोरं जावं लागू शकतं, असा अंदाज बायडेन यांनी व्यक्त केला. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी संसर्ग रोखण्यासाठी लसीकरणावर भर देण्याचं आवाहन केलं. G7 मध्ये सहभागी झालेल्या आरोग्य मंत्र्यांनी गुरुवारी Omicron चा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याची मागणी केली आहे. त्यांनी जागतिक आरोग्यासाठी हा सर्वात मोठा धोका असल्याचे म्हटलं आहे. कोरोनाचा हा नवीन प्रकार अनेक देशांमध्ये पसरला आहे. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) नुसार, अमेरिकेला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. सध्या दररोज सरासरी १,१५० लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. अमेरिकेतील अनेक विद्यापीठं व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी पुन्हा ऑनलाइन मोडवर येत आहेत.

joe biden - omicron
Omicron मुळे चिंता वाढली, UK मध्ये एका दिवसात ७८,६१० कोरोना रुग्णांची नोंद
joe biden - omicron
‘ऑक्सफर्ड’च्या आवारात उभारणार ‘पूनावाला बिल्डिंग’

दरम्यान, 1 डिसेंबरपर्यंत, संसर्गाच्या दररोजच्या नवीन प्रकरणांची सरासरी 86,000 होती. परंतु 14 डिसेंबर रोजी तो आकडा 117,000 वर गेला असून, त्यामध्ये एकूण 35 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.