दक्षिण आफ्रिकेतून कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनचा (Omicron Variant) उद्रेक झाला आहे. आतापर्यंत १५ देशांत हा व्हेरियंट आढळून आला असून जगभरात भीती व्यक्त केली जात आहे. या ओमिक्रॉनमुळे दक्षिण आफ्रिकेत एकाच दिवसात कोरोनाची (South Africa Corona Cases) रुग्णसंख्या दुप्पट झाली आहे. बुधवारी ही संख्या ४,३७३ वरून ८,५६१ वर पोहोचली. त्यामुळे चिंता आणखी वाढली आहे.
दक्षिण आफ्रिकेमध्ये नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला जवळपास २०० कोरोनाचे रुग्ण आढळून येत होते. मात्र, १५ नोव्हेंबरच्या जवळपास कोरोनाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ होऊ लागली. त्यानंतर हा ओमिक्रॉन व्हेरियंट असल्याचे शास्त्रज्ञांच्या लक्षात आले. ओमिक्रॉन व्हेरियंटचा शोध लागला तेव्हापासून दक्षिण आफ्रिकेतील कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. बुधवारी सापडलेल्या कोरोनाचा पॉझिटिव्हीटी दर हा नोव्हेंबरच्या सुरुवातीच्या दरापेक्षा १६.५ टक्क्याने अधिक आहे. येत्या काही दिवसात आणखी कोरोनाची रुग्णसंख्या तिप्पट होण्याची शक्यता आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रादेशिक व्हायरोलॉजिस्ट डॉ निक्सी गुमेडे-मोएलेत्सी यांनी द असोसिएटेड प्रेसला सांगितले.
गेल्या जून आणि जुलै महिन्यात डेल्टा व्हेरियंटने देखील दक्षिण आफ्रिकेत धुमाकूळ घातला होता. त्यावेळी २०,००० रुग्ण दिवसाला सापडत होते. ६० दशलक्ष लोकसंख्या असलेल्या या देशात आतापर्यंत ९० हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच २.९ दशलक्ष लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच सध्या दक्षिण आफ्रिकेतील नऊ प्रांतापैकी पाच प्रांतामध्ये ओमिक्रॉनने धुमाकूळ घातला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.