ओमिक्रॉन व्हेरिएंट शोधणाऱ्या वैज्ञानिकाला धमकीचे पत्र

धमकीच्या पत्रानंतर ऑलिव्हिरा यांच्या सुरक्षेत वाढविण्यात आली आहे.
Omicron
Omicronsakal media
Updated on

जोहान्सबर्ग : कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनची (Omicron Variant) जगभरातील वाढती रूग्णसंख्या चिंतेचा विषय बनला असून, दक्षिण अफ्रिकेत सर्वात पहिल्यांदा या विषाणूची ओळख पटविणाऱ्या वैज्ञानिकाला धमकी देण्याचा धक्कादायकप्रकार समोर आला आहे. दरम्यान, या प्रकरणाची पोलीस तपास करत आहेत. (Omicron variant discovered scientist get life threatening letter )

Omicron
कोविड महामारी हाताळण्यास राज्य सरकार यशस्वी : मुंबई उच्च न्यायालय

राष्ट्रपती सिरिल रामाफोसा यांच्या कार्यालयाला प्रोफेसर तुलिओ डी ऑलिव्हिरा (Tulio de Oliveira) यांच्यासह अनेक आघाडीच्या कोविड-19 संशोधकांचा उल्लेख करणारे धमकीचे पत्र मिळाले आहे, अशी माहिती पोलीस सेवेचे राष्ट्रीय प्रवक्ते विष्णू नायडू यांनी संडे टाइम्सला दिली आहे. (National spokesman of South African Police Service on Letter) प्रोफेसर ऑलिव्हिरा यांनी ओमिक्रॉन व्हेरिएंट शोधणाऱ्या टीमचे नेतृत्व केले आहे.

एक आठवड्यापूर्वी आमच्या निदर्शनास ही बाब आली. त्यानंतर या प्रकरणाला प्राधान्य देण्यात आले आहे. या धमकीच्या पत्रानंतर ऑलिव्हिरा यांच्या सुरक्षा वाढविण्यात आली आहे. दरम्यान, शास्त्रज्ञांना लक्ष्य केले जात आहे हे निंदनीय आहे, असे मत विद्यापीठाचे प्रवक्ते मार्टिन विल्जोन (Martin Viljoen) यांनी व्यक्त केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.