जिनेव्हा : जगभरात गेल्या चोवीस तासात २५ लाख जणांना कोरोनाची लागण झालेली असताना जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) सरचिटणीस ट्रेडोस घेब्रेयेसस यांनी ओमिक्रॉनच्या (Omicron Variant) लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असा इशारा दिला आहे. ओमिक्रॉन हा लस घेतलेल्या नागरिकांना डेल्टाच्या तुलनेत कमी धोकादायक ठरत आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. मागील व्हेरिएंटप्रमाणेच ओमिक्रॉनमुळेही नागरिकही मोठ्या संख्येने रुग्णालयात दाखल होत आहेत आणि काहींचा जीव जात असल्याचेही ट्रेडोस घ्रेब्रेयेसस यांनी म्हटले आहे.
जिनेव्हा येथे माध्यमांशी बोलताना नव्या व्हेरिएंटमुळे रुग्णांची विक्रमी वाढ होत असल्याचे ट्रेडोस यांनी नमूद केले. अनेक देशात डेल्टाच्या तुलनेत ओमिक्रॉन वेगाने पसरत आहे. कोरोना संसर्गाची ही सुनामी व्यापक आणि वेगवान असून जगभरातील आरोग्य यंत्रणांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंट हा डेल्टाच्या तुलनेत गंभीर नसल्याचे जाणवत असले तरी सौम्य रूपातून त्याकडे पाहू नये.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात म्हटले की, अन्य देशात पसरणाऱ्या संसर्गाशी तुलना केल्यास अमेरिकेत सर्वाधिक वाढ नोंदली गेली आहे. अमेरिकेत २,५५६,६९० रुग्ण आढळून आले असून ही ९२ टक्के वाढ आहे. ब्रिटनमध्ये १,१०४,३१६ नवीन रुग्ण आढळून आले असून ही वाढ ५१ टक्के आहे. भारतात १०२,३३० नवीन रुग्ण आढळून आले असून ही १२० टक्के वाढ आहे. ट्रेडेस घेब्रेयेसस यांनी म्हटले की, पहिल्या पिढीचे लसीकरण संसर्गाच्या सर्व व्हेरिएंटला रोखू शकत नाही. परंतु रुग्णालयात दाखल होणे आणि संसर्गामुळे होणारे मृत्यू याचे प्रमाण कमी करण्यास उपयुक्त आहे. लसीकरण, सामाजिक अंतर पाळणे, मास्कचा वापर आणि गर्दीत न जाण्याचे आवाहन केले आहे.
अमेरिकेत बूस्टर डोसला कमी प्रतिसाद
अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना बायडेन प्रशासन बूस्टर डोसवर लक्ष देत आहेत. परंतु नागरिकांचा फारसा उत्साह दिसून येत नसल्याचे चित्र आहे. पाच महिन्यांपूर्वीच अमेरिकेत बूस्टर डोसला मान्यता दिली आहे.
न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालानुसार, आतापर्यंत केवळ ३५ टक्के लोकांनाच बूस्टर डोस दिला आहे. १२ ते १७ वयोगटातील युवकांना देखील बूस्टर देण्याबाबत मंजुरी देण्यात आली. परंतु बूस्टरबाबत लोक उत्साही नाहीत. अमेरिकेत ६२ टक्के लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. अमेरिकेत दररोज सुमारे ५ लाख
८५ हजार रुग्ण आढळून येत असून दोन आठवड्याच्या तुलनेत ही संख्या अडीचशे पट अधिक आहे. रुग्णालयात भरती होण्याचे प्रमाणही ५३ टक्के वाढले आहे. मात्र मृतांचे प्रमाण ३ टक्क्यांनी कमी झाले आहे.
जगभरातील कोरोना स्थिती
चीनमध्ये सामूहिक संसर्गातून ११६ जणांना बाधा
ब्रिटनमध्ये लस घेतलेल्या नागरिकांची चाचणी नाही
ऑस्ट्रेलियात नाइट क्लब बंद करण्याचे निर्देश
जगभरात २४ तासात २५ लाख जणांना कोरोना
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.