तिबेटमध्ये प्रत्येक कुटुंबातून एका व्यक्तीला चिनी सैन्यात पाठवणं बंधनकारक

तिबेटीयन युवकांची PLA मध्ये भरती करण्याधी लॉयलिटी टेस्ट केली जाते.
PLA
PLA
Updated on

बीजिंग: चीनने तिबेटमध्ये (chian tibet) प्रत्येक कुटुंबातून एका व्यक्तीला पीपल्स लिबरेशन आर्मीमध्ये पाठवणं बंधनकारक केलं आहे. भारताला लागून असलेल्या नियंत्रण रेषेजवळ (LAC) लष्करी तैनाती मजबूत करणे, हा चीनचा त्यामागे उद्देश आहे. तिबेटीयन युवकांची (PLA) भरती करण्याधी लॉयलिटी टेस्ट (loyalty test) केली जाते. त्यांची निष्ठा तपासली जाते. ते चाचणीत उत्तीर्ण झाले, तरच त्यांची PLA मध्ये निवड होते. इंडिया टुडे टीव्ही सुत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. (One soldier per family China recruiting Tibetans in PLA for deployment at LAC dmp82)

लडाख, अरुणाचल प्रदेश या प्रतिकुल हवामान असलेल्या प्रदेशासह LAC वर चीन आपली सैन्य शक्ती अधिक बळकट करण्याचा प्रयत्न करतोय. "तिबेटीयन कुटुंबातून प्रत्येक एका व्यक्तीची सैन्यामध्ये निवड करण्याचा उपक्रम चिनी सैन्याने सुरु केलाय. भारताला लागून असलेल्या सीमारेषेवर त्यांची कायमस्वरुपी तैनाती करण्यात येईल" असे सरकारी सूत्रांनी सांगितले.

PLA
कामावरुन घरी परतणाऱ्या विवाहित महिलेवर टॅक्सीमध्ये बलात्कार

"भारताला लागून असलेल्या सीमेवर विशेष मोहिमा पार पाडण्यासाठी चीन तिबेटीयन युवकांची सैन्यामध्ये भरती करत असल्याची आम्हाला गुप्तचरांकडून माहिती मिळाली आहे" असे सूत्रांनी सांगितले. लॉयलिटी टेस्ट पास झाल्यानंतरच त्यांची भरती केली जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()