ChatGPT : "AI वर कंट्रोल हवे नाही तर.." चॅट जीपीटी किंगनेच दिला धक्कादायक इशारा

एआय किती धोकादायक ठरू शकतं याबाबत अमेरिकेच्या संसदेत सुनावणी झाली.
Open AI
Open AIEsakal
Updated on

गेल्या वर्षी चॅट जीपीटी लाँच झाल्यापासून 'एआय' म्हणजेच आर्टिफिशिअल इंटेलिजन्स बाबत सर्वांचेच कुतूहल जागे झाले आहे. एआय आपल्या नोकऱ्या खाणार का याची भीती जगभरातील कित्येक लोकांना लागून राहिली आहे. अशातच ओपन एआय कंपनीचे सीईओ सॅम अल्टमॅन यांनी जगाला गंभीर इशारा दिला आहे.

ओपन एआय (Open AI) या कंपनीनेच चॅट जीपीटी (Chat GPT) लाँच केले होते. त्यानंतर एकामागोमाग एक असे भरमसाठ एआय टूल्स जगभरात लाँच झाले. एआय समाजासाठी आणि लोकशाहीसाठी किती धोकादायक ठरू शकतं याबाबत अमेरिकेच्या संसदेत सुनावणी झाली. त्यावेळी ओपन एआयचे सीईओ यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. यातच त्यांनी एआयवर नियंत्रण आणण्याची गरजही व्यक्त केली.

Open AI
AI Opportunities : ‘एआय’मुळे संधी वाढतील!

सुनावणीच्या सुरुवातीलाच झटका

ही सुनावणी सुरू झाली, तेव्हा संसदीय उपसमीतीचे अध्यक्ष रिचर्ड ब्लुमेंथल यांनी सर्वांना एक ऑडिओ क्लिप ऐकवली. यामध्ये एका संसद सदस्याचा आवाज येत होता. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे, या ऑडिओ क्लिपमधील आवाज खऱ्या सदस्याचा नव्हे, तर एआयने तयार केलेला होता. हा प्रकार पाहून सर्वांनाच झटका बसला.

एआय धोकादायक

अल्टमन (Sam Altman) यांनी यावेळी एआय तंत्रज्ञान हे धोकादायक असल्याचं मत व्यक्त केलं. एआयच्या माध्यमातून चुकीची माहिती पसरवली जाणे सहज शक्य आहे. त्यामुळे त्यावर सरकारचे काही प्रमाणात नियंत्रण असणे गरजेचे आहे असं ते म्हणाले.

चुकीची माहिती तयार करणे हा समस्येचा केवळ एक भाग आहे. ती पसरल्यानंतर होणारे नुकसान अधिक असते. त्यामुळे, मिसइन्फॉर्मेशनला आळा घालण्यासाठी सर्वांनीच एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे अल्टमन म्हणाले.

Open AI
OpenAI : चॅट जीपीटीचं पुढचं व्हर्जन आणणार का?

लायसन्सचा पर्याय

एआयचा (Sam Altman on AI) चुकीचा वापर टाळण्यासाठी सॅम अल्टमन यांनी यावेळी सरकारला एक पर्याय सुचवला. बायडेन सरकार शक्तिशाली एआयच्या वापरासाठी लायसन्स पद्धती सुरू करू शकते, असं ते म्हणाले. एआयचा चुकीचा वापर केल्यास हे लायसन्स रद्द करावे, जेणेकरून पुढील धोका टळेल असंही ते म्हणाले.

एआय सोडवेल मोठ्या समस्या

एआयमुळे एकीकडे नोकऱ्या गमावण्याची भीती व्यक्त होत असताना, सॅम यांनी मात्र याला नकार दिला. ते म्हणाले, की एआय एखादे काम सोपे करू शकते, मात्र ते नोकरी करू शकत नाही. याउलट एआयमुळे कित्येक नोकऱ्या तयार होऊ शकतात, असं त्यांनी स्पष्ट केलं.

Open AI
Stock Market: ChatGPT ने केले मालामाल! विचारले- कुठे गुंतवणूक करावी? उत्तराने पालटले नशीब

यासोबतच, मानवासमोर असलेल्या कित्येक मोठ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी एआय फायद्याचं ठरू शकतं असंही सॅम म्हणाले. क्लायमेट चेंज, कॅन्सर ट्रीटमेंट अशा समस्या एआय सोडवू शकेल असा विश्वास सॅम यांनी यावेळी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.