युक्रेनवरून भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन येणारा पायलट काय म्हणाला? Viral Video

बुडापेस्ट ते नवी दिल्ली या विमानातली ही घटना आहे
युक्रेनवरून भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन येणारा पायलट काय म्हणाला? Viral Video
Updated on

Russia-Ukraine News : रशिया आणि युक्रेनचे युद्ध सुरू आहे. या दरम्यान युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अनेक मुलं भारतात परतली असली तरी आणखी काही परतीच्या प्रतिक्षेत आहेत. या विद्यार्थ्यांना ऑपरेशन गंगा या उपक्रमाद्वारे विशेष विमानाने (Special Flight for Evacuation) भारतात आणले जात आहे. अशाच एका विमानाच्या टेकऑफपूर्वी पायलटने लोकांना जे सांगितले ते ऐकून सगळेच भावूक झाले.

युक्रेनवरून भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन येणारा पायलट काय म्हणाला? Viral Video
बाबा वेंगा यांनी रशियासंदर्भात काय भविष्यवाणी केलीये माहितीये?

हे विमान स्पाइसजेटचे होते. विमानात आलेल्या सर्व प्रवाशांचे स्वागत करून वैमानिकाने केलेली घोषणा वेगळी होती. बुडापेस्ट ते नवी दिल्ली असे हे फ्लाईट युक्रेनमधून सुखरूप परतलेल्या भारतीयांनी भरले होते. स्पाइसजेटच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

युक्रेनवरून भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन येणारा पायलट काय म्हणाला? Viral Video
युक्रेनच्या शेतकऱ्याचा ट्रॅक्टर पडला रशियन टॅंकवर भारी!

पायलट म्हणाला....

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये विमानातील पायलट सर्वांचे स्वागत करत घोषणा करतो- तुम्ही सगळे सुरक्षित आहात. हे पाहून आम्हाला आनंद झाला आहे. आम्हाला तुमच्या साहस,धैर्य आणि दृढनिश्चयाचा अभिमान आहे. तुम्ही अनिश्चितता, कठीण प्रसंग, कष्ट आणि भीतीवर मात करून इथवर पोहोचला आहात. आता आपल्या मातृभूमीत जाण्याची वेळ आली आहे. तुम्ही आरामत बसा आणि कुटुंबाला भेटण्याची वाट पाहा. शेवटी जयहिंद म्हणत पायलटने आपले बोलणे पूर्ण केले. यानंतर टाळ्या आणि देशभक्तीच्या घोषणांनी विमानात एक वेगळाच आनंद पाहायाला मिळाला.

युक्रेनवरून भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन येणारा पायलट काय म्हणाला? Viral Video
Zelensky यांच्या पत्नीचा असा आहे पाठिंबा, देतेय रशियाविरूद्ध लढण्याची ताकद!

व्हायरल झाला व्हिडिओ

हा व्हिडिओ स्पाइस जेटने शेअऱ केला असून हजारो लोकांनी पाहिला. पायलटने ज्या पद्धतीने मुलांचे स्वागत केले ते लोकांना खूप आवडते. मुलांबरोबर केलेला काळजीपूर्ण संवादही भावला. तर काही लोकांनी वैमानिकाला त्याच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. युक्रेनमध्ये असलेले सर्व भारतीय लवकरात लवकर परतावेत अशी इच्छा लोकांनी व्यक्त केली आहे.

युक्रेनवरून भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन येणारा पायलट काय म्हणाला? Viral Video
Ukraine-Russia Crisis : रशिया युक्रेनमध्ये कोण सरस! जाणून घ्या दोघांची लष्करी ताकद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.