अफगाणिस्तानच्या बिघडत्या स्थितीमुळे अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन (joe biden) यांच्या अडचणी वाढत आहेत.
वॉशिंग्टन- अफगाणिस्तानच्या बिघडत्या स्थितीमुळे अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन (joe biden) यांच्या अडचणी वाढत आहेत. यासोबतच दहशतवादी ओसामा बिन लादेन याचा उल्लेख वारंवार होत आहे. त्यातच एका रिपोर्टमध्ये ओसामा बिन लादेनने 2010 मध्ये लिहिलेल्या एका पत्राचा हवाला देत मोठा खुलासा करण्यात आला आहे. दावा करण्यात आलाय की, या पत्रात लादेनने बायडेन यांना राष्ट्रपती करण्याचा उल्लेख केला होता. ओसामाचा विश्वास होता की, बायडेन हे अयोग्य राष्ट्रपती सिद्ध होतील. 'हिंदूस्तान टाईम्स'ने यासंदर्भातील वृत्त दिलंय. (Afghanistan International Latest News)
2010 मध्ये लिहिलेल्या एका पत्रात ओसामा बिन लादेनने आपल्या दहशतवाद्यांसाठी काही सूचना जारी केल्या होत्या. यात लादेनने म्हटलं होतं की, बायडेन अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी सक्षम नाहीत. ओसामा बिन लादेनला वाटायचं की, 'तत्कालीन राष्ट्रपती ओबामा यांची हत्या करण्यात आल्यास त्यांच्यानंतर ज्यो बायडेन राष्ट्रपती बनतील. अलकायदासाठी ही चांगली संधी असेल. ओसामाला विश्वास होता की, बायडेन यांच्याकडे सरकार चालवण्याची क्षमता नाही. त्यामुळे ते अमेरिकेला सांभाळू शकणार नाहीत. बायडेन राष्ट्रपती बनल्यास अमेरिका संकटात येईल. त्यामुळे त्यांना लक्ष्य करण्यात येऊ नये.'
माहितीनुसार, या पत्रावर मे 2010 ची तारीख आहे. लादेनने 48 पानांच्या पत्रावरील 36 व्या पानावर लिहिलंय की, 'आम्ही हल्ले करण्यासाठी दोन गट तयार करणार आहोत. एक गट पाकिस्तानमध्ये आणि दुसरा गट अफगाणिस्तानमध्ये सक्रिय असेल. बायडेन यांची प्रतिमा दहशतवाद्यांविरोधात कमकूवत दिसत आहे.' लादेन याचे हे पत्र चर्चेचा विषय ठरले आहे.
दरम्यान, अफगाणिस्तान तालिबान्यांच्या हातात पडला आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन यांनी अफगाणिस्तानमधून ऑगस्टपर्यंत सैन्य माघारीची घोषणा केली. त्यानंतर तालिबानी अधिक सक्रिय झाले. त्याने अनपेक्षित अशा गतीने जवळपास संपूर्ण अफगाणिस्तानवर ताबा मिळवलाय. माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्य परत बोलवणार असल्याचं जाहीर केलं होतं. यावर शिक्कामोर्तब ज्यो बायडेन यांनी केला. बायडेन यांनी अफगाणिस्तानवर तालिबान राज प्रस्थापित होण्याची शक्यता कमी असल्याचं म्हटलं होतं. पण, ते खोटे ठरले आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.