Israel War: इस्त्राइलमध्ये परिस्थिती गंभीर! 500 हून अधिक बळी, कित्येक नागरिक बेघर... आतापर्यंत काय घडलं?

Israel War
Israel War
Updated on

तेल अविव- इस्त्राइल आणि हमास दहशतवाद्यांमध्ये सुरु असलेल्या संघर्षाने गंभीर स्वरुप धारण केलं आहे. संघर्षामध्ये आतापर्यंत ५०० पेक्षा लोकांना मृत्यू झाला आहे. हमासच्या हल्ल्यात ३०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. तर इस्त्राइलच्या प्रतिहल्ल्यात २३० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झालाय. (Over 500 Killed As Israel-Palestine War Escalates, Residents Flee Homes)

इस्त्राइलमध्ये संघर्षाला सुरुवात झाली आहे. शनिवारी सकाळी हमास दहशतवादी संघटनेने इस्त्राइलवर रॉकेट हल्ला सुरु केला. २० मिनिटांत तब्बल ५००० रॉकेट गाझा पट्टीतून इस्त्राइलच्या प्रदेशात डागण्यात आले. यात इस्त्राइलचे मोठे नुकसान झाल्याचं बोललं जातं. वित्त आणि जीवितहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. माहितीनुसार, आतापर्यंत ३०० पेक्षा अधिक नागरिक आणि लष्करी जवानांचा मृत्यू झालाय. हा आकडा वाढतच आहे.

Israel War
Israel Attack: इस्त्रायल युद्धाच्या उंबरठ्यावर; मोदी सरकारकडून तेथील भारतीयांसाठी मार्गदर्शक सूचना जारी

हमासकडून हल्ला सुरु झाल्यानंतर इस्त्रायलने तात्काळ प्रतिहल्ला सुरु केला. पंतप्रधान बेंजामीन नेतन्याहू यांनी पॅलेस्टिन विरोधात युद्ध पुकारले. माहितीनुसार, इस्त्रायलच्या प्रतिहल्ल्यात हमास संघटनेचे २३० पेक्षा अधिक गाझा पट्टीतील नागरिक आणि हमास दहशतवाद्यांचा मृत्यू झालाय, तर अनेकजण जखमी झाले आहे.

Israel War
शत्रूंना घाम फोडणाऱ्या मोसादची भारतात एन्ट्री! इस्त्रायल दुतावासावरील हल्ल्याचा करणार तपास

अनेक इमारती, घरे आणि सार्वजनिक ठिकाणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक लोकांना बेघर व्हावं लागलं आहे. इस्त्राइलमधून येणाऱ्या व्हिडिओमध्ये तेथील परिस्थितीचे गांभीर्य कळून येतंय. अनेक महिलांचे हमासचे दहशतवादी अपहरण करत आहे. अनेकांना पकडून मारलं जात आहे. त्यामुळे सर्वत्र दहशततीचे वातावरण आहे.

मध्य पूर्व आशियातील परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. युद्धाच्या घोषणेनंतर काही देशांनी इस्त्रायला पाठिंबा दिलाय तर काहींनी पॅलेस्टिनींचे समर्थन केले आहे. अमेरिका इस्त्रायलच्या बाजूने भक्कमपणे उभा राहिलाय तर भारतानेही इस्त्रायलसोबत असल्याचं म्हटलं आहे. दुसरीकडे कतार, अफगाणिस्तान, पाकिस्तान या देशांनी पॅलेस्टिनला पाठिंबा जाहीर केलाय. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.