स्पॅनिश चित्रकार पाब्लो पिकासो (Pablo Picasso) यांची चित्र कायमच चर्चेचा विषय ठरली आहे. आशयपूर्ण तरीही काहीतरी गुढ लपलेली ही चित्र अनेकांना कोड्यात पाडत असतात. त्यामुळे पाब्लो पिकासो यांच्या चित्रांचा आजवर अनेक दिग्गजांनी अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आहे. अलिकडेच पिकासो यांच्या १९३२ मध्ये तयार करण्यात आलेल्या चित्राचा लिलाव करण्यात आला आहे. खिडकीवर बसलेल्या (मेरी थेरेस) एका महिलेचं हे चित्र असून ते चक्क १०३. ४ मिलिअन डॉलरला विकलं गेलं आहे. ऑक्शन हाऊसने (Auction House) याविषयी माहिती दिली आहे. (pablo picassos woman sitting by a window sold for 103 million dollar in new york)
न्यूयॉर्कमधील (New York) क्रिस्टी (Christie's) येथे १०३. ४ मिलिअन डॉलरमध्ये (साडेसात अरब) विकलं गेलं आहे. १९३२ मध्ये रेखाटण्यात आलेलं हे चित्र ९० मिलिअन डॉलरला विकलं गेलं असून १९ मिनिटांच्या बोलीमध्ये त्याची निवड करण्यात आली आहे. ९० मिलिअन बोली लागल्यानंतर त्याची रक्कम व कमिशन मिळून या चित्राची किंमत १०३. ४ मिलिअन डॉलर झाली आहे.
कोविड-१९ सारख्या महामारीच्या काळातही हे चित्र १०३. ४ मिलिअन डॉलरला विकलं जाणं हे खरंच फार आश्चर्यकारक आहे. हे चित्र आठ वर्षांपूर्वी लंडनमध्ये २८.६ मिलिअन पाऊंड म्हणजे जवळपास ४४.८ मिलिअन डॉलरला खरेदी करण्यात आलं होतं.
दरम्यान, यापूर्वीदेखील पिकासोच्या पाच कलाकृतींची अशीच १०० मिलिअन डॉलरच्या घरात विक्री झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.