POK: व्याप्त काश्मीर घटनात्मकदृष्ट्या पाकिस्तानचा भाग नाही, अवामी अ‍ॅक्शन कमिटी UN मध्ये जाण्याच्या तयारीत

Pakistan: "आम्ही, मीरपूरचे लोक सुसंस्कृत आहोत, पण आमच्यावर दडपशाही झाली, लुटले, जबरदस्तीने विस्थापित केले गेले आणि आजही तोच विनाश सुरू आहे."
Occupied Kashmir is not constitutionally part of Pakistan
Occupied Kashmir is not constitutionally part of PakistanEsakal
Updated on

जॉइंट अवामी ऍक्शन कमिटीच्या मीरपूर चॅप्टरचे प्रमुख नेते आरिफ चौधरी यांनी नुकतेच मीरपूर प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषद घेतली, ज्यात पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) लोकांची पाकिस्तानी प्रशासनाकडून कशी अवहेलना होत आहे याची व्यथा मांडली.

पाकिस्तानच्या फायद्यासाठी वारंवार बलिदान देऊनही पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिकांना दिलेली आश्वासने आजही पूर्ण झालेली नाहीत. इथल्या नागरिकांकडे सतत दुर्लक्ष होतेय, तसेच त्यांना दडपशाहीला तोंड द्यावे लागत आहे, असे चौधरी म्हणाले.

चौधरी म्हणाले, "आम्ही, मीरपूरचे लोक सुसंस्कृत आहोत, पण आमच्यावर दडपशाही झाली, लुटले, जबरदस्तीने विस्थापित केले गेले आणि आजही तोच विनाश सुरू आहे."

परिषदेदरम्यान आरिफ चौधरी यांनी पाकव्याप्त काश्मीर हा घटनात्मकदृष्ट्या पाकिस्तानचा भाग नसल्याचे ठामपणे सांगितले.

पाकिस्तानच्या राज्यघटनेचा संदर्भ देत चौधरी यांनी नमूद केले, "पाकिस्तान घटनेच्या कलम 257 नुसार, पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानचा भाग नाही. 1940 च्या उत्तरार्धात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील परस्पर करारांवर आधारित संयुक्त राष्ट्रांच्या ठरावात त्याचा दर्जा घोषित करण्यात आला होता. त्यावेळी, हे परस्पर ठरवले गेले की, पाकव्याप्त काश्मीरच्या लोकांना 26 सुविधा पुरविल्या जातील. पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रात करारावर स्वाक्षरी केल्यामुळे, आमच्या लोकांप्रती सुविधा देण्यास ते बांधील आहेत."

Occupied Kashmir is not constitutionally part of Pakistan
Hindu's In Pakistan: पाकिस्तानात हिंदूंची फरफट सुरूच, सतत होणाऱ्या अत्याचाराविरोधात अल्पसंख्याक रस्त्यावर

पाकिस्तानच्या वीज उत्पादनात महत्त्वपूर्ण योगदान असूनही पाकव्याप्त काश्मीरमधील तीव्र लोडशेडिंगवर त्यांनी टीका केली आणि पाकिस्तानच्या घटनेनुसार न्याय्य वागणूक देण्याचे आवाहन केले.

पाकव्याप्त काश्मीरमधील गंभीर लोडशेडिंगच्या महत्त्वपूर्ण समस्येचे निराकरण करताना चौधरी म्हणाले, "पाकव्याप्त काश्मीर भूसंपत्तीने समृद्ध आहे, विशेषत: पाणी, ज्याचा वापर संपूर्ण पाकिस्तानसाठी वीज निर्माण करण्यासाठी केला जातो. धरणसाठी मीरपूर शहराच्या महत्त्वपूर्ण भागाचा त्याग केला. त्यामुळे आज मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती होत आहे."

Occupied Kashmir is not constitutionally part of Pakistan
Swedish Woman In Nagpur: जन्मदात्या आईच्या शोधात स्वीडनमधील महिला पोहोचली नागपुरात! म्हणाली, एकदा तिला भेटायचंय अन्...

आरिफ चौधरी यांनी शेवटी सांगितले की, "पाकिस्तानी संविधानातील कलमांचा हवाला देऊन हे मुद्दे संयुक्त राष्ट्रात आणण्यास आम्हाला भाग पाडले आहे. हे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानसाठी लज्जास्पद असेल. आम्ही पाकिस्तानच्या स्थापनेसाठी आणि समृद्धीसाठी बलिदान दिले आहे. आम्ही मागणी करतोय की, सरकारने आमच्या समस्या गांभीर्याने घ्याव्यात आणि त्यांचे निराकरण करावे."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.