Hijab Row : तुम्हाला अंतर्वस्त्र घालावीच लागतील! पाकिस्तान एअर लाइन्सच्या सूचना

एअर होस्टेसच्या ड्रेस कोडबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत.
PIA
PIASakal
Updated on

PIA New Guidelines For Hostesses Dress : इराणमध्ये सक्तीच्या हिजाबविरोधात सुरू असलेल्या महिलांच्या आंदोलनादरम्यान पाकिस्तानमधील एअर होस्टेसबद्दल धक्कादायक बातमी समोर आली आहे. पाकिस्तान एअर लाइन्सने एअर होस्टेसला अंतर्वस्त्र परिधान करण्याची सक्ती केली आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र द एक्सप्रेस ट्रिब्यूनने वृत्त दिले आहे.

PIA
Uddhav Thackeray : जे 'अढळ' ते...; आढळराव पाटलांचे नाव न घेता ठाकरेंची टीका

प्रकाशित वृत्तानुसार, पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स 'पीआयए' ने त्यांच्या क्रू मेंबर्सना साधे कपडे घालण्याबरोबरच अंडरगारमेंट्स घालणे बंधनकारक केले आहे. पाकिस्तानच्या नॅशनल एअर लाईन्सचे जनरल मॅनेजर अमीर बशीर यांनी एअरलाईन्सच्या एअर होस्टेसच्या ड्रेसिंगवर आक्षेप घेतला. यानंतर एअर होस्टेसच्या ड्रेस कोडबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत.

PIA
Video : चाहत्यांसोबत गरबा खेळताना दिसला 'गोल्डन बॉय' नीरज चोप्रा

बशीर यांनी सांगितले की, पाकिस्तानी एअर होस्टेसने एअरलाइन्सच्या कार्यालयात जाताना, हॉटेलमध्ये राहताना आणि इतर शहरांमध्ये प्रवास करताना चुकीचे कपडे परिधान केल्याच्या तक्रारी आल्या होत्या. योग्य पोशाख न घातल्याने पीआयएची प्रतिमा डागाळत आहे. याच कारणामुळे येथून पुढे महिला कर्मचाऱ्यांच्या ड्रेसवर लक्ष ठेवण्यात येणार असून, पारदर्शक कपडे परिधान केल्यास अंतर्वस्त्र घालण्याची सक्ती करण्यात आली आहे. यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांचे कपडे आक्षेपार्ह दिसणार नाही.

PIA
Sharad Pawar : एक दौरा अन् सत्तेत पुन्हा...; सुप्रिया सुळेंच्या विधानानं भुवया उंचावल्या

पाकिस्तान एअर लाईन्सचा हा निर्णय त्यावेळी आला आहे. जेव्हा इराणमध्ये हिजाब वाद सुरू आहेत. महिला फ्लाइट अटेंडंटच्या ड्रेसवरून कोणताही वाद नव्याने उद्भवू नये या अशाप्रकारची मार्गदर्शक तत्त्वे घोषित केल्याचे मानले जात आहे. पाकिस्तानी एअर होस्टेसचा सध्याचा ड्रेसही पारंपारिक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.