Pakistan Attacks : एका वर्षात 365 हल्ले… दहशतवादाचा बालेकिल्ला असलेल्या पाकिस्तानमध्ये इतके बॉम्बस्फोट का होतात?

पाकिस्तानला दहशतवादाचा बालेकिल्ला म्हटलं जातं
Pakistan Attacks
Pakistan Attacksesakal
Updated on

Pakistan Attacks : पाकिस्तानला दहशतवादाचा बालेकिल्ला म्हटलं जातं. बहुतेक आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना इथेच वाढल्या. अशा स्थितीत पाकिस्तानसारख्या देशालाच बॉम्बस्फोटांना सामोर जावं लागतं हेच मोठं आश्चर्य आहे. यामागे अनेक कारणे आहेत.

पाकिस्तानात शुक्रवारी एकापाठोपाठ दोन आत्मघाती हल्ले झाले. ईद मिलाद-उन-नबीच्या दिवशी झालेल्या बॉम्बस्फोटात 58 जणांचा मृत्यू झाला होता. तर 70 हून अधिक जखमी झाले. मृतांमध्ये पोलिसांचाही समावेश आहे. स्फोटापूर्वी ईद मिलाद-उन नबीच्या मिरवणुकीसाठी लोक जमले होते. मात्र, कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही. पाकिस्तानला दहशतवादाचा बालेकिल्ला म्हटले जाते. बहुतेक आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना इथेच वाढल्या आहेत.पाकिस्तानसारख्या देशालाच बॉम्बस्फोटांना सामोर जावं लागतं हेच मोठं आश्चर्य आहे. यामागे अनेक कारणे आहेत. इथे फोफावलेले दहशतवादी या देशाला का लक्ष्य करत आहेत?

Pakistan Attacks
Health Care Tips रात्री या तीन पावडरचे सेवन केल्यास आरोग्यास मिळतील जबरदस्त फायदे

5 वर्षात 1316 हल्ले

दक्षिण आशिया टेररिझम पोर्टलच्या आकडेवारीनुसार, 5 वर्षांत पाकिस्तानमध्ये 1,316 हल्ले झाले. या हल्ल्यांमध्ये 2,297 लोकांचा मृत्यू झाला. या वर्षी 27 सप्टेंबर 2023 पर्यंत पाकिस्तानमध्ये 354 हल्ले झाले. त्याच वेळी, गेल्या वर्षी 365 हल्ले झाले आणि 600 हून अधिक मृत्यू झाले.

Pakistan Attacks
Mental Health: तुमच्या वर्तनाचे मानसिकतेवरही होतात परिणाम?

अशा प्रकारे पाकिस्तानात आत्मघातकी हल्ले सुरू झाले

पाकिस्तानमधील हल्ल्यांवर नजर टाकल्यास गेल्या दीड दशकात त्यांची संख्या सर्वाधिक वाढल्याचे लक्षात येईल. 2007 साली येथे आत्मघातकी हल्ले सुरू झाले. इस्लामाबादच्या लाल मशिदीत उपस्थित असलेल्या कट्टरपंथीयांना हटवण्याचा प्रयत्न करताना पाकिस्तानी लष्कराने केलेल्या कारवाईमुळे हे हल्ले वाढले असल्याचं म्हटलं जातंय. त्यांना रोखण्यासाठी पाकिस्तानी लष्कराने 2014 मध्ये ऑपरेशन सुरू केले आणि त्याला जरब-ए-अरब असं नाव दिलं.

Pakistan Attacks
Health Care News: तुम्हाला वजन कमी करायचंय? तर या 5 फळांपासून राहा दूर, नाहीतर...

या ऑपरेशनद्वारे पाकिस्तानी लष्कराने अनेक दहशतवादी संघटनांशी संबंधित लोकांना ठार केले. अनेकांना देश सोडून पलायन करावे लागले. त्यामुळे अशा हल्ल्यांचे प्रमाण कमी झाले. लष्कराच्या कारवाया मंदावल्याने येथे आत्मघातकी हल्ल्यांचे प्रमाण वाढले. 2020 बद्दल बोलायचे तर येथे 55 हल्ले झाले आणि 2021 मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी 27 हल्ले झाले. आता हे हल्ले पाकिस्तानच्या सुरक्षेसाठी मोठी समस्या बनले आहेत.

Pakistan Attacks
Health Problems : सणासुदीच्या काळात आरोग्य बिघडले आहे का ? मग आहारात ‘हे’ बदल करायला विसरू नका

लष्कराच्या त्या कारवाईनंतर दहशतवाद्यांनी धडा शिकवण्याची योजना आखली आणि वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणल्याचं सांगण्यात आलं. त्याच वेळी, काही दहशतवादी संघटनांनी स्वतःला बळकट करण्यासाठी आणि आपले अस्तित्व प्रस्थापित करण्यासाठी हल्ल्यांची योजना आखली.

Pakistan Attacks
Health Care: 'या' व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे वाढू शकतो मधुमेहाचा धोका, जाणून घ्या

पोलीस आणि सुरक्षा दलांना लक्ष्य केले

गेल्या वर्षभरात येथे झालेल्या हल्ल्यांवर नजर टाकल्यास दहशतवादी कारवाया वाढल्याचे लक्षात येईल. येथील सर्वसामान्य जनता, पोलीस आणि सुरक्षा दलांना लक्ष्य केले जात आहे. त्यात पाकिस्तान आधीच आर्थिक संकटाशी झुंजत आहे आणि राजकीय अस्थिरतेला तोंड देत आहे. काही दिवसांपूर्वी खैबर पख्तुनख्वा येथे आयोजित रॅलीवर हल्ला झाला होता. या रॅलीत 44 जणांचा मृत्यू झाला. 100 हून अधिक जखमी झाले.

Pakistan Attacks
Health Care: लिंबासोबत 'या' गोष्टींचे सेवन करणे पडेल महागात, जाणून घ्या

सर्वात जास्त हल्ले कोणी केले?

इस्माइली स्टेटचा पाकिस्तानी गट या हल्ल्याला जबाबदार असल्याचे मानले जात होते. तहरीक-ए-तालिबानने या हल्ल्याचा निषेध केला आहे. तर तेहरीक-ए-तालिबानने (टीटीपी) अलीकडच्या काळात लागोपाठ अनेक हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली होती. जुलै महिन्यात तेहरीक-ए-तालिबानने 70 हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये बहुतांश सुरक्षा दलांना लक्ष्य करण्यात आले.या वर्षाच्या सुरुवातीला टीटीपीने पेशावरमध्ये पहिला हल्ला केला होता. ज्यामध्ये मशिदीला लक्ष्य करण्यात आले होते. फेब्रुवारीमध्ये सशस्त्र दहशतवाद्यांनी कराची पोलीस कार्यालयावर हल्ला केला होता. एप्रिलमध्ये क्वेटाच्या कंधारी मार्केटमध्ये हल्ला झाला होता.पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनच्या रिपोर्टनुसार, 18 जून 2022 ते 18 जून 2023 या कालावधीत एकट्या खैबर पख्तूनख्वामध्ये 15 आत्मघाती स्फोट झाले.

Pakistan Attacks
Liver Health : कायम पायांच्या टाचा दुखतात? तुमच्या यकृतात असू शकते गडबड, ही 5 लक्षणं अजिबात करू नका इग्नोर

हल्ले का वाढले आणि जबाबदार कोण?

खैबर पख्तूनख्वाची सीमा अफगाणिस्तानशी आहे. तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात सक्रिय आहे. हा गट अफगाणिस्तानातील दहशतवादी गटांपेक्षा थोडा वेगळा आहे, परंतु त्यांची विचारधारा एकच आहे. 2021 मध्ये अफगाणिस्तानात तालिबान सत्तेवर आल्यापासून पाकिस्तानमध्ये स्फोट वेगाने वाढू लागले.

Pakistan Attacks
Health Care News: तुम्हाला वजन कमी करायचंय? तर या 5 फळांपासून राहा दूर, नाहीतर...

गेल्या वर्षीच टीटीपीने पाकिस्तान सरकारसोबत असे हल्ले न करण्याचा करार मोडला होता. यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले वाढू लागले. यामध्ये टीटीपीची मोठी भूमिका होती. पण या हल्ल्यांमागे ही एकमेव संघटना जबाबदार नव्हती. ISIL-k ने येथे अनेक हल्लेही केले. तालिबान या संघटनेला आपला प्रतिस्पर्धी मानतात.

Pakistan Attacks
Health Care: लिंबासोबत 'या' गोष्टींचे सेवन करणे पडेल महागात, जाणून घ्या

आता अल कायदाही पाकिस्तानात स्वत:ला मजबूत करण्याच्या तयारीत आहे. दहशतवादी संघटनांमध्ये प्रतिष्ठा प्रस्थापित करण्याच्या लढाईत इथे केवळ मृत्यू होत आहेत. पण तालिबान संरक्षण तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, पाकिस्तानमध्ये सध्या 7 ते 8 दहशतवादी संघटना सक्रिय आहेत. पाकिस्तानमध्ये ज्या प्रकारे दहशतवादी संघटना सक्रिय आहेत आणि ज्या प्रकारे ते येथील सुरक्षा व्यवस्था कमकुवत करत आहेत, ते भारतासारख्या शेजारी देशांसाठीही धोकादायक ठरू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.