कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतेय तरीही पाक सरकारने लॉकडाउन हटविला; 'हे' आहे महत्त्वाचं कारण!

Pak_PM_Imran_Khan
Pak_PM_Imran_Khan
Updated on

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये कोरोनाबाधितांच्या आकड्यांमध्ये सातत्याने वाढ होत असतानाही पाकिस्तानने शनिवार (ता.९) पासून लॉकडाउन शिथिल करण्यास सुरवात केली आहे. महिनाभरापूर्वी कोरोनाबाधितांच्या आकड्यात सातत्याने वाढ होत असल्याने पाकिस्तानात लॉकडाउन लागू करण्यात आले होते. 

पाकिस्तानमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा २७,४७४ वर पोहोचला असून गेल्या २४ तासांमध्ये देशात १,६३७ नवीन कोरोनाबधित रुग्ण सापडले आहेत. तर, २४ जणांचा मृत्यू झाल्याने देशातील मृतांचा आकडा ६१८ वर पोहोचला आहे. असे असतानाही पाकिस्तानने लॉकडाउन उठवण्याचा निर्णय घेतला आहे. 

इम्रान खान यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, आम्ही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी लोकांना जास्तीत जास्त दिलासा देण्यासाठी प्रयत्न करीत होतो. मात्र, देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे खालावली असून अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी आम्हाला लॉकडाउन उठवण्याचा निर्णय घ्यावाच लागणार आहे. इम्रान खान यांच्या लॉकडाउन उठवण्याच्या निर्णयाला खैबर पख्तुन आणि सिंध प्रांतातील सरकारने पाठिंबा दर्शवला आहे.

दरम्यान, पाकिस्तानमध्ये ५ आठवड्यांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. लॉकडाउनच्या निर्णयाबाबतची अधिकृत घोषणा इम्रान खान सरकारने केली नव्हती. तेथील प्रांतीय सरकारतर्फेच प्रतिबंध घालण्यात येत होते. 

कोरोनाशी संबंधित विदेशातील घडामोडींसाठी येथे ► क्लिक करा

पाकिस्तानात दोन टप्प्यांमध्ये लॉकडाउन पुकारण्यात आला होता. पहिल्या टप्प्यामध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. मात्र, दुसऱ्या टप्प्यात ते शिथिल करण्यात आले. लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात लोक नमाज पढण्यासाठी मस्जिदमध्ये जात होते. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय योग्य असल्याचे सरकारचे म्हणणे होते. तर इम्रान खान सरकारचा हा निर्णय अंगलट येण्याची शक्यता असल्याचे तेथील डॉक्टरांचे म्हणणे होते. 

देशभरातील घडामोडी वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पहाटेपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत अधिकाधिक व्यवसाय चालू ठेवण्यात यावेत, असे आवाहन लॉकडाऊन शिथिल करताना पाक सरकारने केले आहे. खैबर पख्तूनख्वा प्रांतीय सरकारने लॉकडाउनचे निर्बंध हटविताना म्हटले आहे की, दुकाने आणि व्यवसाय हे आठवड्यातून चार दिवस सुरू ठेवावेत आणि सायंकाळनंतर ते बंद करण्यात यावेत. मस्जिदमध्ये प्रार्थना करताना सामाजिक अंतराबाबतच्या शासकीय मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यास मौलवींनी होकार दर्शविला आहे. त्यानंतर रमजान महिन्यात मशिदींमध्ये सामूहिक नमाज अदा करण्यास सरकारने परवानगी दिल्याचे काहींचे म्हणणे आहे. 

उद्योग आणि व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी १५ जुलैपर्यंत पाकमधील सर्व शाळा बंद राहतील, असेही पाक सरकारने स्पष्ट केले आहे. दुसरीकडे लॉकडाऊन आणि कोरोना व्हायरसला आळा घालण्यासाठी पाक सरकारकडे कोणतेही ठोस धोरण नसल्याची टीका पाकचे माजी पंतप्रधान शाहीद खाकान अब्बासी यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.