X Blocked In Pakistan: पाकिस्तानकडून एलन मस्कला धक्का, 'हे' कारण देत ब्लॉक केला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X

Elon Musk: पाकिस्तानमध्ये ८ फेब्रुवारी रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांदरम्यान तेथील सरकारने अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ब्लॉक केले होते. मतदानाच्या दिवशी पाकिस्तानमध्ये इंटरनेट सेवाही बंद होती.
Pakistan Blocked Elon musk's Social media platform X
Pakistan Blocked Elon musk's Social media platform XEsakal
Updated on

पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाने बुधवारी सांगितले की, त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव फेब्रुवारीमध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X ब्लॉक केला आहे. युजर्सनी फेब्रुवारीच्या मध्यापासून पाकिस्तानमध्ये X वापरताना समस्या येत असल्याचा तक्रारी नोंदवण्यास सुरुवात केली आहे, परंतु सरकारने यावर कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नव्हती. (Pakistan Blocked Elon musk's Social media platform X)

गृह मंत्रालयाने बुधवारी न्यायालयात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स ब्लॉक केल्याची माहिती दिली आहे.

पाकिस्तानने न्यायालयात सादर केलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, "ट्विटर/एक्स ने पाकिस्तान सरकारच्या कायदेशीर निर्देशांचे पालन न केल्यामुळे त्यांच्या प्लॅटफॉर्मवरुन होत असलेल्या गैरवापरामुळे त्यांना ब्लॉक केले आहे."

Pakistan Blocked Elon musk's Social media platform X
Google Employees Arrested: Google CEO कार्यालयात घुसले पोलीस, अनेकांना अटक, काय आहे गाझा-इस्राइल कनेक्शन?

पाकिस्तानमध्ये ८ फेब्रुवारी रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांदरम्यान तेथील सरकारने अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ब्लॉक केले होते. मतदानाच्या दिवशी संपूर्ण पाकिस्तानमध्ये इंटरनेट सेवाही बंद ठेवण्यात आली होती.

तथापि, निवडणुकीनंतर, अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म पूर्वीप्रमाणेच काम करू लागले परंतु X बंदच राहिले.

पाकिस्तानच्या सिंध उच्च न्यायालयानेही तेथील दूरसंचार प्राधिकरणाला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X ची सेवा पूर्ववत करण्याचे आदेश दिले होते, परंतु सरकारने X ची सेवा पुन्हा सुरू केली नाही. आता सरकारने न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून X ला राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका असल्याचे म्हटले आहे.

Pakistan Blocked Elon musk's Social media platform X
Elon Musk Internet Service: भारतात लवकरच होणार स्टारलिंकची एंट्री, इलाॅन मस्कच्या दौऱ्यात होऊ शकते घोषणा

सिंध उच्च न्यायालयाने एक्सला ब्लॉक करण्याच्या निर्णयावर जोरदार टीका केली. सरकारने एका आठवड्यात एक्स पुन्हा सुरू करण्याचे निर्देश दिले. क्षुल्लक गोष्टी बंद करून गृहमंत्रालय काय साध्य करत आहे. जगाला आपल्यावर हसत आहे," असे सिंध उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अकील अहमद अब्बासी यांनी म्हटले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.