TLP नेत्याच्या सुटकेवरून पाकिस्तानात हिंसाचार; 4 पोलिस ठार, 250 जण जखमी

Pakistan
Pakistanesakal
Updated on
Summary

पाकिस्तानात (Pakistan) सरकार आणि तेहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान (TLP) यांच्यात मोठा संघर्ष सुरु आहे.

इस्लामाबाद : पाकिस्तानात (Pakistan) सरकार आणि तेहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान (TLP) यांच्यात मोठा संघर्ष सुरु आहे. कट्टरपंथी नेत्याच्या सुटकेसह चार मागण्यांसाठी टीएलपीनं इस्लामाबादमध्ये मोर्चा काढलाय. लब्बैकचे कार्यकर्ते मुरीदच्या छावणीत पोहोचले असून इथून इस्लामाबाद फक्त 14 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळं इस्लामाबाद सर्व बाजूंनी सील करण्यात आलंय, तर तीन शहरांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आलीय.

गुंजारवाला येथे बुधवारी झालेल्या हिंसाचारात 4 पोलिस ठार झाले असून 250 हून अधिक जण जखमी झाल्याचे कळतंय. सरकारनं पोलिस आणि इतर सुरक्षा दलांच्या माध्यमातून हे थांबवण्याचा प्रयत्न केल्यास मोठ्या प्रमाणात हिंसाचार होईल आणि त्याला सरकारच जबाबदार असेल, असा इशाराही टीएलपीनं दिलाय.

Pakistan
पाकिस्तानात महिलेनं दिला 7 मुलांना जन्म; 6 चिमुरड्यांचा मृत्यू

TLP ची मागणी काय आहे?

सहा महिन्यांपासून तुरुंगात असलेले कट्टरपंथी नेते साद रिजवी यांची सुटका करण्याची टीएलपीची पहिली मागणीय. सरकारनं यासाठी सहमतीही दर्शवलीय. टीएलपीवरील बंदी हटवून तेथील लोकांनाही सोडण्यात येईल, असंही इम्रान सरकारनं सांगितलंय. परंतु, फ्रान्सच्या राजदूताला हटवण्याच्या मागणीवर टीएलपी ठाम आहे. मात्र, सरकार यासाठी तयार नाही.

Pakistan
डायनासोर पृथ्वीवर पुन्हा 'राज्य' करणार? अर्जेंटिनात सापडली 100 अंडी

फ्रेंच राजदूतावरून 'वाद'

फ्रान्सच्या राजदूताला हटविल्यास याचे गंभीर परिणाम देशाला भोगावे लागतील, असं सरकारचं म्हणणं आहे. युरोपीय देश पाकिस्तानच्या विरोधात जातील आणि पाकिस्तानींना युरोपमध्ये जाणं कठीण होऊन बसेल. तर, दुसरीकडे टीएलपी झुकायला तयार नाही. फ्रेंच राजदूताने आमचा अपमान केला असून त्यांना देशातून हाकलण्यात यावं, असं टीएलपीनं इम्रान सरकारला सांगितलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.