पाकिस्तानची आर्थिक स्थिती ढासळली असून शाळेत अध्यापनाचे कार्य करणाऱ्या शिक्षकांना नियमित वेतन देण्यास पैसे नसल्याचे दिसून येत आहे. त्यांना अनेक महिन्यांपासून वेतनापासून वंचित राहावे लागत आहे.. पाकिस्तानच्या खैबर पख्तुन्ख्वा प्रांतात सरकारी शाळांतील शिक्षकांना आठ महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात सापडले आहे.