Pakistan Moon Mission: भारताचे 'चांद्रयान' कॉपी करण्यासाठी निघाला PAK, चीनच्या रॉकेटने केले प्रक्षेपित! आता होत आहे ट्रोल

Pakistan Moon Mission: पाकिस्तानने शुक्रवारी चंद्राचा अभ्यास करण्यासाठी आपली पहिली चंद्र मोहीम सुरू केली. चीनच्या लाँग मार्च रॉकेटच्या मदतीने पाकिस्तानची चंद्र मोहीम चीनच्या हैनान प्रांतात पाठवण्यात आली आहे.
Pakistan Moon Mission
Pakistan Moon Missionesakal
Updated on

Pakistan Moon Mission : भारताने चांद्रयान 3 मोहिम यशस्वी करत संपूर्ण जगात नाव कमावलं. पाकिस्ताने देखील भारताची मोहीम कॉपी करण्याचा प्रयत्न केला आहे. चीनच्या मदतीने पाकिस्तानने आपला छोटा उपग्रह अंतराळात सोडला. चीनने काल (शुक्रवार) आपल्या चंद्र संशोधन मोहिमेचे चांगई-6 अंतराळयान प्रक्षेपित केले. ते काल स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 05:27 वाजता लॉन्च करण्यात आले.

चायना नॅशनल स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन (CNSA) ने ही माहिती दिली. त्यानुसार चंद्राच्या गूढ दूरच्या भागातून नमुने गोळा करून ते पृथ्वीवर परत आणण्याचे काम चाँगे-6 मिशनवर सोपवण्यात आले आहे. मानवी चंद्र संशोधनाच्या इतिहासातील हा अशा प्रकारचा पहिलाच प्रयत्न आहे.  

चिनी अंतराळयानासोबत पाकिस्तानने आपला उपग्रहही पाठवला. पाकिस्तान सरकारला बीजिंगच्या सहकार्याने भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेची कॉपी करायची होती, परंतु ती फसली गेली आहे. यामध्ये पाकिस्तानचा वाटा चीनपेक्षा जास्त आहे. चीनच्या चांगई 6 रॉकेटच्या मदतीने पाकिस्तानची चंद्र मोहीम ICUBE-Qamar प्रक्षेपित करण्यात आली आहे.

ICUBE-Qamar हा उपग्रह चीनच्या शांघाय युनिव्हर्सिटी आणि पाकिस्तानच्या नॅशनल स्पेस एजन्सीच्या सहकार्याने पाकिस्तानच्या इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस टेक्नॉलॉजी (IST) ने डिझाइन आणि विकसित केला आहे. लाँचचे पाकिस्तानच्या IST च्या वेबसाईटवर थेट प्रक्षेपण केले.

Pakistan Moon Mission
Planet Nine : नेपच्यूनच्या पलीकडे असू शकतो आणखी एक ग्रह; आतापर्यंत राहिला होता लपून.. शास्त्रज्ञांना मिळाले नवे पुरावे!

चीनचा चाँगई 6 चंद्रावर उतरल्यानंतर परत येईल पण त्याच्यासोबत असलेला पाकिस्तानचा ICUBE-Qamar तेथे पोहोचणार नाही. चीनचे चांद्रयान पाकिस्तानी ICUBE-Qamar ला चंद्राच्या कक्षेत सोडेल आणि नंतर तो त्याचा पुढील प्रवास पूर्ण करेल. क्यूबसॅट्स हे अंतराळातील विशिष्ट कार्यांसाठी डिझाइन केलेले छोटे उपग्रह आहेत. घन आकारात तयार केलेले हे उपग्रह मॉड्यूलर घटकांचा समावेश करतात.

चीनसोबत पाकिस्ताननेही सहभाग घेतला पण हे मिशन पाकिस्तान सरकारसाठी अडचणीचे ठरले आहे. आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानला आता विरोध होऊ लागला आहे. पाकिस्तानी लोक सोशल मीडियावर संताप व्यक्त करत आहेत. आपल्या सर्वांना चंद्र मोहीम नको आहे. त्याचे काय लोणचे टाकणार?, असा प्रश्न पाकिस्तान लोक विचारत आहेत. 

Pakistan Moon Mission
OpenAI लाँच करणार गुगलला टक्कर देणारं सर्च इंजिन! जाणून घ्या काय असेल खास?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.