Imran Khan Arrested : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना राजधानी इस्लामाबादमध्ये अटक करण्यात आली आहे. पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (पीटीआय) चे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे माजी पीएम इमरान खान यांना इस्लामाबाद हाय कोर्टाच्या बाहेर अटक करण्यात आले आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, इम्रान खान यांना अलकादिर ट्रस्ट केसमध्ये करण्यात आले आहे. पीटीआयचे नेते इम्रान खान यांच्या अटकेनंतर त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. पीटीआयने इम्रान खान यांच्या अटकेचा निषेध केला आहे.
त्याचबरोबर इम्रान खान यांच्या अटकेनंतर इस्लामाबाद पोलिसांनीही एक निवेदन जारी केले आहे. इस्लामाबादच्या आयजीनी माध्यमांना सांगितले की, इम्रान यांना कादिर ट्रस्ट प्रकरणात अटक करण्यात आली आहे. सध्या परिस्थिती सामान्य आहे. आयजींनी सांगितले की, जमावबंदी लागू करण्यात आली आहे. कोणी नियमांचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल.
काही दिवसांपूर्वी इम्रान खान (Imran Khan) यांच्याविरूद्ध इस्लामाबाद सत्र न्यायालयानं एक अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं होतं. सभेला संबोधित करताना महिला न्यायाधीशाला धमकावल्याप्रकरणी खान यांच्याविरूद्ध ही कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे त्यांना कधीही अटक केली जाण्याची शक्यता वर्तवली जात होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.