Imran Khan : जीवाला धोका, 'ते' तीन हल्लेखोर पुन्हा माझ्यावर प्राणघातक हल्ला करणार; इम्रान खान यांचा मोठा दावा

वजिराबाद इथं एका मोर्चादरम्यान इम्रान खान यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता.
Imran Khan News
Imran Khan Newsesakal
Updated on
Summary

वजिराबाद इथं एका मोर्चादरम्यान इम्रान खान यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता.

Imran Khan News : या महिन्याच्या सुरुवातीला ज्या तीन गुन्हेगारांनी माझ्यावर हल्ला केला, ते पुन्हा प्राणघातक हल्ला करू शकतात, असा दावा पाकिस्तानचे (Pakistan) माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी केला आहे.

रावळपिंडी (Rawalpindi) इथं त्यांचा पक्ष तेहरीफ-ए-इन्साफच्या (PTI) रॅलीला संबोधित करताना इम्रान खान म्हणाले, मी त्या हल्ल्यात मृत्यूला अगदी जवळून पाहिलं आहे. माझ्या डोक्यावरून गोळ्या जात होत्या, असं त्यांनी नमूद केलं.

Imran Khan News
Baba Ramdev : स्त्री-पुरुष असा भेदभाव कधीच नव्हता; महिलांबाबत वादग्रस्त बोलणाऱ्या बाबा रामदेवांचा यू-टर्न?

3 नोव्हेंबरला वजिराबाद इथं एका निषेध मोर्चादरम्यान इम्रान खान यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. इम्रान यांच्यावर झालेल्या खुनी हल्ल्यात तीन शूटर्सचा सहभाग होता. या हल्ल्यात पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाच्या अध्यक्षांच्या उजव्या पायाला गोळी लागली. मध्यावधी निवडणुकांसाठी दबाव आणण्यासाठी ते सरकारविरोधात मोर्चाचं नेतृत्व करत होते.

Imran Khan News
Narendra Modi : पंतप्रधान मोदींना धमकी देणाऱ्या तरुणाला अटक; रात्री उशिरा ATS नं घेतलं ताब्यात

रावळपिंडीतील रॅलीला संबोधित करताना इम्रान खान पुढं म्हणाले, 'दोन हल्लेखोरांपैकी एकानं माझ्यावर आणि इतर पीटीआय नेत्यांवर गोळीबार केला. दुसऱ्या हल्लेखोरानं कंटेनरवर गोळीबार केला, तर तिसरा व्यक्ती मारेकऱ्याला शांत करण्यासाठी तिथं होता.' डॉननं दिलेल्या वृत्तानुसार 'इम्रान यांनी दावा केलाय की, 'तिसऱ्या शूटरनं रॅलीमध्ये एका व्यक्तीला ठार केलं, त्यानंतर तो संभाव्य मारेकऱ्याला मारण्याचा प्रयत्न करत होता.'

Imran Khan News
CAA कायदा लागू होणार, हिम्मत असेल तर रोखून दाखवा; भाजप नेत्याचं ममता बॅनर्जींना थेट चॅलेंज

'पीटीआयचे नेते विधानसभेचा राजीनामा देणार'

त्याचवेळी इम्रान खान यांनी सांगितलं की, "आमचा पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे सर्व नेते विधानसभेचा राजीनामा देतील. आम्ही विधानसभेच्या सर्व जागा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच आम्ही त्याची तारीख जाहीर करू."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.