पाकिस्तानचे अमेरिकेशी घनिष्ठ संबंध; लष्करप्रमुख बाजवांचा दावा

qamar javed bajwa
qamar javed bajwa
Updated on

पाकिस्तानमध्ये मागील काही दिवसांपासून राजकीय घडामोडी घडत आहे. लवकच देशात सत्तापालट होणार असून यातच पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर बाजवा यांनी पाकिस्तानचा कॅम्प पॉलिटिक्सवर विश्वास नाही तसेच चीन आणि अमेरिकेशी पाकिस्तानचे घनिष्ठ धोरणात्मक संबंध आहेत. तसेच दोन्ही देशांशी असलेल्या संबंधांवर परिणाम न करता, चीन आणि युनायटेड स्टेट्स या दोघांशीही संबंध वाढवण्याचा आणि विस्तारित करण्याचा प्रयत्न करत असल्याचे इस्लामाबाद बोलताना सांगितले. डॉनने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

पंतप्रधान इम्रान खान यांना विधानसभेत अविश्वास प्रस्तावाचा सामना करावा लागण्याच्या एक दिवस आधी ते बोलत होते. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मंजूर केलेल्या लष्करी कारवाईत रशियाने युक्रेन आक्रमणादरम्यान इम्रान खान यांच्या रशिया भेटीबद्दल अमेरिका नाराज असल्याची गुप्त माहिती मिळाल्याचा दावा पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी केला होता. दरम्यान अमेरिकेने इम्रान खान यांनी लावलेले आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले असून इम्रान खानच्या दाव्यात तथ्य नसल्याचे म्हटले आहे.

दरम्यान या पार्श्वभूमीवर रशिया-युक्रेन परिस्थितीबद्दल बोलताना जनरल बाजवा म्हणाले की, रशियाचे युक्रेनवरील आक्रमण तात्काळ थांबवायला हवे. रशियाच्या कायदेशीर सुरक्षेची चिंता असूनही, लहान देशाविरूद्धची आक्रमकता माफ केली जाऊ शकत नाही. ते पुढे म्हणाले की, पाकिस्तानने सातत्याने तात्काळ युद्धविराम आणि शत्रुत्व थांबवण्याचे आवाहन केले आहे. आम्ही संघर्षावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी दोन्ही बाजूंनी तात्काळ संवादाला पाठिंबा देतो असे ते म्हणाले.

qamar javed bajwa
इन्फोसिसचा मोठा निर्णण; रशियातील सर्व कार्यालये करणार बंद

इम्रान खान यांनी गुरुवारी राष्ट्राला दिलेल्या भाषणात, मी राजीनामा देणार नाही हे स्पष्ट सांगतले. ते म्हणाले की, त्यांनी मला त्यांनी तीन पर्याय दिले आहेत राजीनामा, अविश्वास ठरावावर मतदान किंवा लवकर निवडणुका. ते म्हणाले की, मी लवकर निवडणुकांचा पर्याय निवडला कारण सध्या पक्षातील अनेक जण विरोधी पक्षात गेल्याने पक्ष सरकार चालवू शकत नाही, असे ते म्हणाले.

पाकिस्तानी लष्कराने या दाव्याचे कथितपणे खंडन केले आहे आणि म्हटले आहे की त्यांनी त्याला विरोधी पक्षांचा अविश्वास ठरावाचा पर्याय दिला नसल्याचे सांगितले, कारण लष्कर तटस्थ आहे आणि लष्कराची इम्रान खान आणि विरोधकांनी बसून समस्यांवर चर्चा करावी अशी इच्छा आहे.

या दरम्यान पाकिस्तानच्या संसदेत रविवारी अविश्वास प्रस्तावावर मतदान होणार आहे. इम्रान खान रविवारी पंतप्रधानपदी राहू शकणार नाहीत, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

qamar javed bajwa
Realme C31 लाँचची तारीख कन्फर्म! 'या' दिवशी होणार भारतात दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.