Pakistan Air Strike : पाकिस्तानने केला इराणमध्ये एअरस्ट्राईक; दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्याचा दावा - रिपोर्ट

रिपोर्ट्समध्ये मिळालेल्या माहितीनुसार, बीएलए या इराणमधील दहशतवादी संघटनेचे तळ पाकिस्तानने उद्ध्वस्त केले आहेत.
Pakistan Air Strike
Pakistan Air StrikeeSakal
Updated on

Pakistan Air Strike on Iran : इराणने मंगळवारी रात्री (१६ जानेवारी) पाकिस्तानातील काही दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले होते. यानंतर आज पाकिस्तानने पलटवार केला आहे. पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे, की पाकिस्तानने इराणमधील कित्येक दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आहेत. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने याची पुष्टी केली आहे.

रिपोर्ट्समध्ये मिळालेल्या माहितीनुसार, बीएलए या इराणमधील दहशतवादी संघटनेचे तळ पाकिस्तानने उद्ध्वस्त केले आहेत. इराणमधील सिएस्तान-ओ-बलुचिस्तान या प्रांतात पाकिस्तानने हल्ले केले. यावेळी कित्येक दहशतवादी मारले गेले असल्याची माहिती पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. या ऑपरेशनला 'मार्ग बार सर्माचार' असं कोडनेम देण्यात आलं होतंं, असंही मंत्रालयाने स्पष्ट केलं.

पाकिस्तानवर झाला होता हल्ला

पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये असणाऱ्या जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या तळांवर इराणने मिसाईल डागल्या होत्या. यासोबतच ड्रोन हल्ला देखील करण्यात आला होता. या हल्ल्यात दोन मुलांचा जीव गेला, तर तीन मुली जखमी झाल्या होत्या.

Pakistan Air Strike
इराणच्या सर्जिकल स्ट्राईकने पाकिस्तान हादरला, गंभीर परिणाम भोगण्याची दिली धमकी! युद्ध वाढणार का?

या हल्ल्यानंतर पाकिस्तान हादरून गेला होता. या हल्ल्याचा निषेध करत, याचे गंभीर परिणाम होतील असा इशारा पाकिस्तानने इराणला दिला होता. पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचे हे उल्लंघन असल्याचं देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका एक्स पोस्टमध्ये म्हटलं होतं.

संबंध बिघडले, युद्धाची ठिणगी?

यानंतर पाकिस्तानने इराणमधील आपल्या राजदूतांना परत बोलावलं आहे. तसंच, इराणचे पाकिस्तानातील राजदूत, जे सध्या इराणमध्येच आहेत - त्यांना पाकिस्तानात येण्यापासून मज्जाव करण्यात आला आहे. या हल्ल्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत.

Pakistan Air Strike
China New Virus : कोविडसारख्या घातक विषाणूचा उंदरांवर सुरू आहे प्रयोग; चीनमुळे आणखी एका महामारीचा धोका?

यातच आता पाकिस्तानने देखील इराणवर हवाई हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे हा वाद आणखी चिघळणार असून, दोन्ही देशांमध्ये युद्धाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()