पाकिस्तानात गाढवांच्या संख्येत विक्रमी वाढ

दरवर्षी लाखाने भर; चीनमध्ये मोठी मागणी
Donkey
Donkey File Photo
Updated on

इस्लामाबाद : (पीटीआय): कोरोना संसर्गामुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असली तरी नवीन आर्थिक सर्वेक्षणानुसार देशात गाढवांची संख्या प्रचंड वाढली आहे. पाकिस्तान सरकारच्या आर्थिक सर्वेक्षणानुसार २०२०-२१ देशात गाढवांची संख्या याहीवर्षी लाखाने वाढली आहे. पाकिस्तानात गेल्या काही वर्षांपासून दरवर्षी एक लाखाने गाढवांच्या संख्येत भर पडत आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानातील अन्य पशुधनाची वाढ ही सामान्य राहिली आहे. (Pakistan Increase In Donkey Population By 1 1 lakh This Year Survey)

पाकिस्तानात आता गाढवांची संख्या ५६ लाखांपर्यंत पोचली आहे. मागील वर्षी गाढवांची संख्या ५५ लाख होती. गाढवांच्या संख्येत पाकिस्तान जगात तिसरा मोठा देश ठरला आहे. २००१-२००२ पासून दरवर्षी गाढवांची संख्या एक लाखाने वाढत चालली आहे. याशिवाय उंट, घोडे, खेचरसह अन्य जनावरांच्या संख्येत होणारी वाढ मात्र तेरा वर्षांपासून स्थिर राहिली आहे. पाकिस्तानात २०२०-२१ या कालावधीत जनावरांची संख्या २१.३१ दशलक्षने वाढली. तत्पूर्वी २०१९-२० मध्ये २०.७ दशलक्ष संख्येने भर पडली होती. म्हशीची संख्या ४२.४ दशलक्षवर पोचली आहे. तसेच शेळ्यांची संख्या ८०.३ दशलक्षवर पोचली आहे.

Donkey
'डेल्टा व्हेरियंट' लसींचा प्रभाव करतोय कमी; UKच्या तज्ज्ञांचा दावा

दरवर्षी ८० हजार गाढव चीनला पाठवणार

एका करारानुसार पाकिस्तान चीनला दरवर्षी ८० हजार गाढवांची निर्यात करते. त्याचा उपयोग मांस आणि अन्य कामासाठी केला जातो. त्याच्या कातडीचा उपयोग चीनमध्ये अनेक प्रकारे केला जातो. गाढवांच्या कातडीपासून तयार झालेले जिलेटीनने अनेक प्रकारचे पारंपरिक औषधी तयार केली जातात. चीनच्या कंपन्यांनी पाकिस्तानात गाढवांच्या व्यापारासाठी लाखो डॉलर गुंतवणूक केले आहेत. पाकिस्तानात गाढवाच्या जातीनुसार किमती निश्‍चित केल्या जातात.

Donkey
प्यार की निशानी! ४७ वर्षांनंतर सापडली पतीची हरवलेली अंगठी

गाढवांपासून पाकिस्तान कमावतेय नफा

पाकिस्तानात गाढवाच्या कातडीची किंमत १५ ते २० हजार पाकिस्तानी रुपये आहे.त्याची विक्री करून पाकिस्तान बक्कळ नफा कमावत आहे. एवढेच नाही तर पाकिस्तान गाढवांच्या उपचारासाठी वेगळे रुग्णालय देखील उभारले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.